शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

पैशाच्या वादावरून मित्रानेच केला मित्राचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क राजगुरुनगर : शिरोली (ता. खेड) येथे जमिनीच्या पैशाच्या आर्थिक वादावरून जिवलग मित्रानेच मित्राचा डोक्यात दगड घालून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

राजगुरुनगर : शिरोली (ता. खेड) येथे जमिनीच्या पैशाच्या आर्थिक वादावरून जिवलग मित्रानेच मित्राचा डोक्यात दगड घालून खून केला आहे. राहुल बाबाजी सावंत (वय २२, रा. शिरोली, ता. खेड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

या घटनेबाबत दोन आरोपींना पोलिसांनी १२ तासांत जेरबंद केले आहे. राहुल सांवत व हेंमत वाडेकर हे जिवलग मित्र होते. राहुल सांवत व वाडेकर यांनी जमिनीच्या व्यवहारात पैसे लावले होते. राहुल सांवत हा वारंवार वाडेकर यांच्याकडे पैशाची मागणी करत होता. सोमवारी (दि.४) रात्री १० च्या सुमारास राहुल सांवत, हेंमत बाबूराव सांवत (वय २५, रा. शिरोली, ता. खेड), शिवा भाऊ कुडेकर (वय २६, रा. चव्हाणमळा, पाबळ रोड), सुनील मोहन पवार (रा. रेटवडी, ता. खेड) हे सर्व जण राजगुरुनगर शहरालगत असणाऱ्या ढुम्या डोंगरांच्या पायथ्याशी दारू पिण्यास गेले होते. दारू पिल्यानंतर जमिनीच्या पैशावरून वाद झाला. या कारणावरून राहुल सांवत यांच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार स्वप्निल गाढवे, शेखर भोईर, सचिन जतकर, निखिल गिरीगोसावी यांनी आरोपी हेंमत वाडेकर, शिवा कुडेकर या ताब्यात घेतले आहे. सुनील पवार हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. या घटनेबाबत राहुल सांवत यांची मोठी बहिण मोहिनी महेंद्र राक्षे (रा. राक्षेवाडी, ता. खेड) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फोटो : मृत राहुल सावंत