वेल्हेतील शुक्रवारचा आठवडी बाजार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:11 IST2021-04-09T04:11:13+5:302021-04-09T04:11:13+5:30
याबाबत अधिक माहिती देताना असोसिएशनचे अध्यक्ष संदीप नगीने म्हणाले की, शुक्रवार, सोमवार आठवडे बाजार भरला जातो. परंतु कोरोनाची ...

वेल्हेतील शुक्रवारचा आठवडी बाजार बंद
याबाबत अधिक माहिती देताना असोसिएशनचे अध्यक्ष संदीप नगीने म्हणाले की, शुक्रवार, सोमवार आठवडे बाजार भरला जातो. परंतु कोरोनाची आकडेवारी लक्षात घेता रुग्ण वाढत आहे अठरा गाव मावळ, बारागाव मावळ तसेच पानशेत, मार्गासनी विंझर लाशिरगाव मालवली पाबे आदी परिसरातून आठवडी बाजारासाठी नागरिक वेल्ह्यामध्ये येत असतात. आठवडी बाजारात गर्दी होते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शुक्रवार व सोमवार आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अत्यावश्यक सेवेतील दुकाने फक्त सुरू राहणार आहेत, सर्व नियमावलीचे पालन केले जाणार आहे. आठवडी बाजारसाठी कोणीही येऊ नये असे आव्हान वेल्हे व्यापारी असोसिएशनकडून करण्यात आलेले आहे. स्थानिक दुकाने केवळ सुरू राहणार आहेत असे यावेळी नगीने यांनी सांगितले.