शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा नवी सुरुवात! पुण्यातील अप्पा बळवंत चौकात शालेय साहित्याच्या खरेदीसाठी विद्यार्थी अन् पालकांची गर्दी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 17:23 IST

जून महिना सुरू झाला की दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांची पालकांसह पुण्यातील अप्पा बळवंत चौकात एकच झुंबड उडालेली असते.

पुणे:जून महिना सुरू झाला की दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांची पालकांसह पुण्यातील अप्पा बळवंत चौकात एकच झुंबड उडालेली असते. मात्र, मागच्या वर्षी कोरोना संकटाने जसे सर्वच क्षेत्रावर परिणाम झाले त्याला शिक्षण क्षेत्र देखील अपवाद ठरले नाही. यंदाही विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसह शाळा कधी सुरु होणार याबाबत निश्चित सांगता येणे कठीण आहे. मात्र, तरीदेखील ऑनलाईनशाळेची तयारी सुरु झाली आहे. शालेय साहित्याच्या खरेदीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या पुणे शहरातील अप्पा बळवंत चौकात विद्यार्थी आणि पालक यांंची गर्दी दिसू लागली आहे. 

पुणे शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून मोठी घट झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे शहरातील कोरोना निर्बंधात शिथिलता आणण्यात आली असून नागरिकांना दिलासा दिला आहे. याचमुळे मागील काही दोन तीन दिवसांपासून अप्पा बळवंत चौकात शालेय साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे.  दरवर्षी येथे नवीन वर्षाची पुस्तके, वह्या आणि इतर  शालेय साहित्याची खरेदी करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी होत असते. यंदाही  विद्यार्थी आणि पालकांची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, यावेळी कोरोना नियमांचे पालन होणे गरजेचे आहे, कारण अजूनही पूर्णपणे कोरोना संकट निवळलेले नाही. 

कोरोना संकटामुळे मागच्या वर्षी शाळेची दारं बंद झाली. चार भिंतीच्या आत ऑनलाईन शिक्षणाचे वर्ग सुरू झाले. त्यामुळे शाळेतील मित्र मैत्रिणी आणि इतर आनंदाला विद्यार्थी मुकले आहे. चार भिंतीच्या आतल्या शिक्षणाकंटाळले आहेत. कधी एकदा शाळा सुरु होते याचे त्यांना वेध लागले आहेत. मात्र, सध्या तरी शाळा सुरु होण्याची शक्यता नसताना ऑनलाईन शिक्षण हाच एक पर्याय त्यांच्यासमोर आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता विद्यार्थ्यांनी आपली शालेय तयारी सुरु केली आहे. 

मागील वर्षी जून महिन्यात पूर्णपणे कडक लॉकडाऊन असल्यामुळे सर्वकाही बंद होते. त्यात शालेय साहित्याची दुकानांचा समावेश होता. यामुळे मोठ्या नुकसानाला या व्यावसायिकांना सामोरे जावे लागले. यंदा दुकाने सुरु करण्यास परवानगी मिळाली असल्याने या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आणि  शालेय साहित्याच्या खरेदीसाठी होऊ लागलेली गर्दी नक्कीच सुखावणारी आहे. मात्र, यादरम्यान कोरोना नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणcorona virusकोरोना वायरस बातम्याStudentविद्यार्थीSchoolशाळाcollegeमहाविद्यालय