राज्यपालांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार

By Admin | Updated: August 17, 2015 02:28 IST2015-08-17T02:28:34+5:302015-08-17T02:28:34+5:30

भारतीय स्वातंत्र्याच्या ६८ व्या वर्धापनदिनानिमित्ताने राज्यपाल सी. विद्यासागर यांनी विधान भवन येथे ध्वजवंदन केले. त्या वेळी राज्यपाल यांनी स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार

Freedom fighter felicitated at the hands of governor | राज्यपालांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार

राज्यपालांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार

पुणे : भारतीय स्वातंत्र्याच्या ६८ व्या वर्धापनदिनानिमित्ताने राज्यपाल सी. विद्यासागर यांनी विधान भवन येथे ध्वजवंदन केले. त्या वेळी राज्यपाल यांनी स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार, प्रशासकीय अधिकारी व नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
राज्यपाल सी. विद्यासागर यांचे शनिवारी सकाळी ९ वाजता विधान भवन येथे आगमन झाले. त्यावेळी पालकमंत्री गिरीश बापट व विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी स्वागत केले.
महापौर दत्तात्रय धनकवडे, आमदार अ‍ॅड. जयदेव गायकवाड, नीलम गोऱ्हे, भीमराव तापकीर, योगेश टिळेकर, माधुरी मिसाळ, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, स्वातंत्र्यसैनिक आदी उपस्थित
होते. तसेच, माहिती आयुक्त रवींद्र जाधव, पोलीस आयुक्त के. के. पाठक, कृषी आयुक्त विकास देशमुख, शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर, पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे, पिंपरी-चिंचवड आयुक्त राजीव जाधव, नोंदणी महानिरीक्षक एन. रामास्वामी, महापालिका अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, जिल्हा पोलीस अधीक्षक जय जाधव आदी उपस्थित होते.

Web Title: Freedom fighter felicitated at the hands of governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.