तृतीयपंथी, असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी मोफत विशेष लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:11 IST2021-09-13T04:11:32+5:302021-09-13T04:11:32+5:30
पुणे : विद्यानगर येथील चलवादी शिक्षण संस्थेच्या वतीने पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यु. कॉलेजमध्ये तृतीयपंथीयांना व असंघटित कामगारांना विना ...

तृतीयपंथी, असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी मोफत विशेष लसीकरण
पुणे : विद्यानगर येथील चलवादी शिक्षण संस्थेच्या वतीने पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यु. कॉलेजमध्ये तृतीयपंथीयांना व असंघटित कामगारांना विना ओळखपत्र मोफत कोविड लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र नाही. अशा लोकांना अनेक शासकीय लाभापासून वंचित राहावे लागते अशा तृतीयपंथी व असंघटित कामगारांचे लसीकरण करण्यात आले, असे चलवादी शिक्षण संस्थेच्या सचिव रेणुका चलवादी यांनी सांगितले.
वडगाव शेरी मतदारसंघाचे अध्यक्ष नानासाहेब नलावडे,माजी नगरसेवक हुलगेश चलवादी, पुणे शहर राष्ट्रवादी युवती अध्यक्षा अश्विनी परेरा, मनपा समाज विकास विभागाचे अधिकारी रामदास चव्हाण, वडगाव शेरी युवक अध्यक्ष किरण खैरे, उपाध्यक्ष सुहास तळेकर, सिद्धार्थ अष्टेकर, ललित लांडे, उषा सूर्यवंशी, डॉ. संध्या तम्मवार, क्रांतीनाना मळेगावकर, लक्ष्मी पाटोळे, के. टी.सूर्यवंशी, लखन ओव्हाळ, लक्ष्मी कांबळे, संजय टाकळकर, साजन ओव्हाळ, कीर्ती टाकळकर, निरामय संस्थांचे वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.