शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे

By Admin | Updated: June 22, 2016 00:46 IST2016-06-22T00:46:45+5:302016-06-22T00:46:45+5:30

सासवड (ता. पुरंदर) येथील कै. मधुनाना शिवराम जगताप मेमोरियल ट्रस्ट आणि सर्व दातृत्व लाभलेले मित्रमंडळ यांच्या संयुक्त सहकार्यातून, संकल्पनेतून श्रीक्षेत्र नारायणपूर येथील

Free seed for farmers | शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे

शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे

नारायणपूर : सासवड (ता. पुरंदर) येथील कै. मधुनाना शिवराम जगताप मेमोरियल ट्रस्ट आणि सर्व दातृत्व लाभलेले मित्रमंडळ यांच्या संयुक्त सहकार्यातून, संकल्पनेतून श्रीक्षेत्र नारायणपूर येथील ६० अल्प, अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांना आज पहिल्या टप्प्यातील खरिपासाठीचे मोफत बी-बियाणे वाटप पंचायत समितीचे सदस्य आणि शिवसेना पुरंदर तालुकाप्रमुख दिलीप यादव यांच्या हस्ते करण्यात आले.
नारायणेश्वर मंदिर प्रांगणात मोफत बी-बियाणे वाटप कार्यक्रम पार पडला. या वेळी शिवसेना पुरंदर तालुकाप्रमुख दिलीप यादव, शिवसेना पुरंदर तालुका युवकप्रमुख उमेश गायकवाड, सरपंच रामभाऊ बोरकर, सदानंद बोरकर, दिलीप वांढेकर आणि ग्रामस्थ होते. आकाश जगताप, कुणाल जगताप, अक्षय जगताप, ओंकार जगताप, सौरभ जगताप, सत्यजित जगताप, अभिजित जगताप, मंगेश भिंताडे, साहिल अतार, सुशील घोडके, सुभागडे गौरव आदी युवकांनी या मोफत बी-बियाणांसाठी योगदान दिले. अभिजित जगताप यांनी सांगितले की, पुरंदर तालुक्यात १४०० हजारपर्यंत अल्पभूधारक आहेत, तर अत्यल्पभूधारक १७,६१७ हजार शेतकरी आहेत. यांना भुईमूग, भात, पावटा, मका आदी बी-बियाणे देण्यात येणार आहे.

Web Title: Free seed for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.