शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

'पुण्याचे पाणी कमी करु नका; महापौरांनी उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडली आग्रही भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 21:18 IST

कालवा समिती बैठकीत महापौर मुरलीधर मोहोळांची आग्रही मागणी.

ठळक मुद्देदर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी कालवा समितीची बैठक लावण्याचे दिले आश्वासन

पुणे : भामा आसखेडचे पुणे शहराला २.६ टीएमसी पाणी नव्याने मिळत असल्याने खडकवासला प्रकल्पातून पुणे शहराला मिळणारे तितकेच पाणी कमी करावे, या जलसंपदा विभागाच्या प्रस्तावाला विरोध असून पुणे शहराचे पाणी कमी करु नये, अशी भूमिका महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मांडली.

पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत महापौर मोहोळ यांनी भूमिका मांडली. महापौर मोहोळ म्हणाले, 'पुणे शहराची लोकसंख्या, समाविष्ट गावांच्या पाण्याची गरज आणि भविष्यातील एकूणच गरज लक्षात घेत पुणे शहराची पाणीकपात करणे चुकीची आहे. २००१ साली वार्षिक ११.५० टीएमसी पाण्याचा करार झाला होता. मात्र त्यानंतर पाणी वाढवून द्यावे यासाठी सातत्याने प्रयत्न झाले. मात्र निर्णय होऊ शकलेला नाही. त्याउलट पाणीकपात करण्याची पुणेकरांच्या विरोधातील भूमिका जलसंपदा विभागाने घेतली आहे. सद्यस्थितीत पुणे शहराला १८.५ टीएमसीची आवश्यकता आहे.

'पुणे महानगरपालिकेचा गळती कमी करण्याचा प्रयत्न असून २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेमुळे ही पाणीगळती कमी होणार आहे. शिवाय जायका प्रकल्पाच्या माध्यमातून सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते पाणी सिंचनासाठी वापरता येणार आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने आपली भूमिका मागे घ्यावी', असेही मोहोळ म्हणाले.

भाजप आमदाराची पाणीकपातीसंदर्भात मागणी; अजित पवार म्हणाले.....

खडकवासला धरण साखळीत पाणीसाठा पुरेसा असल्याने योग्य ते नियोजन करून पुणेकरांना पाणीकपातीपासून मुक्त करा, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत केली.

यंदा पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. तसेच सध्या कोव्हीड साथही जोरात आहे. अशा परिस्थितीत कधीही पाण्याची गरज भासू शकते. त्यामुळे पाणी कपात करू  नये असे शिरोळे यांनी सांगितले. तसेच पाणी हा मूलभूत घटक असल्याने यावर वारंवार कामाचा आढावा घेण्याची विनंती शिरोळे यांनी पवार यांना केली आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी कालवा समितीची बैठक लावण्याचे आश्वासन दिले आहे.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMLAआमदार