शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत मोफत धान्य वाटप सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 11:45 IST

लाभार्थ्यांनी कोरोना प्रादुर्भावाच्या धर्तीवर रास्तभाव दुकानांमध्ये गर्दी न करता एक मीटर अंतर ठेवत धान्य घ्यावे. प्राधान्य कुटुंब योजना व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना एप्रिल, मे व जुन 2020 महिन्यात करण्यात येणार

ठळक मुद्देप्राधान्य कुटुंब योजना व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना एप्रिल, मे व जुन 2020 महिन्यात वाटप

पुणे : कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटप सुरू झाले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड यांनी दिली आहे. या योजनेत प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना नियमित अन्नधान्या व्यतिरिक्त प्रति सदस्य प्रति महिना ५ किलो तांदुळ मोफत देण्याबाबत शासनाकडुन आदेश प्राप्त झाले आहेत. संबंधित लाभार्थ्यांनी कोरोना प्रादुर्भावाच्या धर्तीवर रास्तभाव दुकानांमध्ये गर्दी न करता एक मीटर अंतर ठेवत धान्य घ्यावे. असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.पुणे जिल्हा ग्रामीण भागासाठी एप्रिल, मे व जून २०२० साठी अन्नधान्याच्या दिलेल्या नियमित नियमानुसार अन्नधान्याचे वाटप विहित दराने त्या-त्या महिन्यात करण्यात येणार आहे. त्यानुसार एप्रिल २०२० करीता अंत्योदय योजनेतील शिधापत्रिका धारकांकरीता २३ किलो गहु व १२ किलो तांदुळ आणि मे व जून २०२० या महिन्यांकरीता अंत्योदय योजनेतील शिधापत्रिका धारकांकरीता २५ किलो गहु व १० किलो तांदुळ प्रत्येक शिधापत्रिकेवर त्या-त्या महिन्यांमध्ये देण्यात येणार आहे. प्राधान्य कुटुंब योजनेतील प्रति लाभार्थ्यांकरीता दरमहा ३ किलो गहु व २ किलो तांदुळ देण्यात येणार आहे. सदर गव्हाची किंमत २ रुपये प्रति किलो तर तांदुळ ३ रुपये प्रति किलो आहे.एप्रिल, मे व जुन 2020 साठी अन्नधान्याच्या दिलेल्या नियमित नियतनानुसार विहित दराने अन्नधान्य वितरण झाल्यानंतरच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत वितरीत करण्यात येणाऱ्या मोफत तांदळाचे वाटप प्रति सदस्य प्रति महा ५ किलो या प्रमाणे प्राधान्य कुटुंब योजना व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना एप्रिल, मे व जुन 2020 महिन्यात करण्यात येणार आहे. संबंधित लाभार्थ्यांनी कोरोना प्रादुर्भावाच्या धर्तीवर रास्तभाव दुकानांमध्ये गर्दी न करता एक मीटर अंतर ठेवत धान्य घ्यावे. तरी पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी गायकवाड यांनी केले आहे.

टॅग्स :PuneपुणेCentral Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस