पुणे : शहरातील विविध मॉलमध्ये खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पैसे मोजावे लागतात. यामुळे मॉलमध्ये खरेदीसाठी जाणा-या नागरिकांना मोफत पिण्याचे पाणी पुरविण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या शहर सुधारणा समितीपुढे मांडण्यात आला आहे. या प्रस्तावर येणा-या शहर सुधारणा समितीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे. शहरातील बहुतांशी मॉलमध्ये नागरिकांसाठी मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे येथील छोटे-मोठे हॉटेल व्यावसायिक आणि खाद्यपदार्थ विक्रेते जादा दराने पाण्याची विक्री करतात. सध्या शहरातील मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये एक लिटर पाण्याच्या बाटलीसाठी ३० ते ४५ रुपये मोजावे लागतात. हे दर सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाहीत. परंतु पाण्यासाठी नागरिकांना जास्तीचे दर द्यावेच लागतात. त्यामुळे मॉलमध्ये नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याने त्यांना मोफत पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव राणी भोसले यांनी मांडला आहे. परंतु, त्यावर पुढील बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याचे समितीचे अध्यक्ष सुशील मेंगडे यांनी सांगितले. त्यानुसार शहरातील मॉलची संख्या, तेथील पाण्याची व्यवस्था, त्याच्या विक्रीचा दर याबाबतची माहिती प्रशासन गोळा करण्यात येणार असून त्यानंतर प्रस्तावावर कार्यवाही होणार आहे.
शहरातील मॉलमध्ये मोफत पाणी पुरवठा करा, शहर सुधारणा समितीत प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 21:24 IST
शहरातील बहुतांशी मॉलमध्ये नागरिकांसाठी मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे येथील छोटे-मोठे हॉटेल व्यावसायिक आणि खाद्यपदार्थ विक्रेते जादा दराने पाण्याची विक्री करतात.
शहरातील मॉलमध्ये मोफत पाणी पुरवठा करा, शहर सुधारणा समितीत प्रस्ताव
ठळक मुद्देमॉलमध्ये आर्थिक लूट होत असल्याने मोफत पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव