शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

मोफत तपासण्यांसाठीही मोजावे लागतात पैसे; गरिबांची पिळवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 03:37 IST

कमला नेहरू रुग्णालयात डायग्नोस्टिक सेंटरकडून दिरंगाई

- विशाल शिर्के पुणे : डेंग्यू, चिकुणगुणिया, एचआयव्ही अशा रक्त चाचण्या महापालिकेच्या रुग्णालयामध्ये मोफत दिल्या जातात. डेंग्यूसाठी तर सर्व उपचारच मोफत असताना, शहरातील गरीब रुग्णांना याचा लाभच दिला जात नाही. मोफत रक्त तपासणीसाठी देखील पैसे आकारले जात असून, महापालिकेने कमला नेहरू हॉस्पिटलमधे नेमलेल्या डायग्नोस्टिक सेंटरकडून वेळेत रिपोर्ट दिले जात नसल्याने रुग्णांना खासगी पॅथॉलॉजी सेंटरकडे धाव घ्यावी लागत आहे. या प्रकरणी रुग्णाने तक्रार दाखल केल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने संबंधित संस्थेला मेमो बजावला आहे.याप्रकरणी रुग्णाचे वडील युसूफ खान यांनी सामाजिक कार्यकर्ते वाजिद खान यांच्यामार्फत महापालिकेतील सहायक आरोग्य अधिकारी अंजली साबणे यांच्याकडे १७ सप्टेंबर २०१८ रोजी तक्रार दाखल केली होती. डेंग्यूच्या पेशंटवर कोणतेही शुल्क न आकारता मोफत उपचार केले जातात, असे उत्तर आरोग्य विभागाने माहिती अधिकारात दिले आहे. रुग्ण गर्भवती असल्यास त्यास रक्त तपासणीची सुविधा मोफत आहे. सोनोग्राफी आणि एक्स-रेची सुविधादेखील मोफत असल्याचे आरोग्य विभाग म्हणते. अशी रक्त तपासणीची जबाबदारी सार्वजनिक खासगी भागिदारी तत्त्वानुसार क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटरने दिले आहे.या सेंटरकडून मोफत सुविधांची माहिती न देता डेंग्यूच्या रक्तचाचणीसाठी पैसे आकारले जात आहेत. काही तपासण्यांसाठी त्याच रुग्णालयातील खासगी डॉक्टरांकडे पाठविण्यात येत आहे. त्यांच्याकडून केवळ तपासणीसाठीच शंभर रुपये आकारले जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. जुनेद खान (वय १९) यांना कमला नेहरू रुग्णालयात सप्टेंबरमध्ये दाखल करण्यात आले होते. डेंग्यूच्या संशयावरून त्यांचे रक्त तपासणीसाठी क्रस्ना सेंटरकडे दिले; मात्र त्याचा रिपोर्ट वेळेत मिळाला नाही. त्यासाठी ५२ रुपये आकारले होते. या तक्रारीनंतर २४ सप्टेंबर २०१८ रोजी कमला नेहरू रुग्णालयातील क्रस्ना सेंटरला मेमो बजावला. त्यात सेवेबाबत रुग्णांकडून वारंवार लेखी व तोंडी तक्रारी येत आहेत. कामगार लॅब कलेक्शनसाठी वेळेवर येत नाहीत. त्याचे रिपोर्टही तीन दिवसांनी मिळतात. याशिवाय बिलाच्या पावत्या मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्याचा खुलासा करावा असा मेमो काढला. त्यावर प्रश्न सोडून भलतेच उत्तर डायग्नोस्टिक सेंटरने दिले असून, कमला नेहरू रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनीदेखील खुलासा असमाधानकारक असल्याचा अभिप्राय नोंदविला आहे.कामात सुधारणा नाही : कमला नेहरू रुग्णालयाने काढलेला मेमोआपल्या लॅबप्रमुखांना सतत रुग्ण व नातेवाइकांच्या लेखी व तोंडी स्वरूपाच्या तक्रारी देऊनही कामात सुधारणा होत नाही. लॅब कलेक्शनसाठी वेळेवर कामगार येत नाहीत; तसेच अत्यावश्यक रिपोर्टदेखील ३ दिवसांनी मिळतात. लॅबच्या बिलाच्या पावत्या दिल्या जात नाहीत. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांकडून अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत.क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटरने केलेला खुलासाआपल्या तक्रारीची संस्थेच्या संचालक मंडळाने योग्य दखल घेतली असून, प्रयोगशाळा प्रमुख व तंत्रज्ञ यांना समज दिली आहे. भविष्यात तक्रार येऊ न देण्याचा तपशिलवार आराखडा मागितला आहे. संस्थेने पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे. आपल्या सूचनेनुसार त्यात वाढ करण्यात येईल.खुलाशावर वैद्यकीय अधीक्षकांचा अभिप्रायरुग्णाच्या नातेवाइकांनी केलेल्या तक्रारीनंतर कमला नेहरूमधील वैद्यकीय अधीक्षकांनी क्रस्ना डायग्नोस्टिकने असमाधानकारकखुलासा दिला असल्याची माहिती महानगर पालिकेच्या सहायक आरोग्य अधिकाऱ्यांना कळवली आहे.महापालिकेच्या रुग्णालयात डेंग्यूवरील संपूर्ण उपचार मोफत असल्याचे महापालिका म्हणते. संबंधित रुग्णाकडे तर पिवळ्या रंगाची शिधापत्रिकादेखील होती. त्यानंतरही उपचार मोफत सोडा, सवलतीच्या दरातही मिळत नाहीत. उलट रक्ततपासण्यांसह तपासणी देखील खास व्यक्तीकडून करून घेण्यास सांगण्यात येते. याप्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार दिली आहे.- वाजिद खान, तक्रारकर्तेरुग्णालयात गेल्यानंतर रक्त तपासणीसाठी खासगी पॅथॉलॉजीतील व्यक्तींना बोलाविण्यात आले. रक्त तपासणीसाठी सहाशे रुपये मोजावे लागले. त्याचे कारण प्रशासनाला विचारले असता आमचे रिपोर्ट येण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतात. रुग्णाची स्थिती थोडीशी खराब असल्याने आम्ही ते केले. मात्र, आणखी तपासण्यासाठी त्याच रुग्णालयातील खासगी डॉक्टरकडे पाठविण्यात आले. त्यांनी तपासणीचेच शंभर रुपये घेतले. - तबस्सुम खान, रुग्णाची आई

टॅग्स :hospitalहॉस्पिटलPuneपुणे