शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कमवा आणि शिका याेजनेत घाेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 21:35 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका’ या योजनेमध्ये आर्थिक घोळ झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका’ या योजनेमध्ये आर्थिक घोळ झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. योजनेचा आर्थिक फायदा बोगस विद्यार्थ्यांना होत असल्याची साशंकता व्यक्त केली जात आहे. योजनेत प्रत्यक्ष काम करणाऱ्या विद्यार्थ्यांऐवजी अन्य विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात मानधन जमा होत असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. दरम्यान, या घोळाची व्याप्ती शोधण्यासाठी विद्यापीठाने उच्चस्तरीय समिती नेमली आहे. 

विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण मंडळातर्फे गरजू विद्यार्थ्यांसाठी कमवा व शिका ही योजना अनेक वर्षांपासून राबविली जात आहे. विद्यापीठाच्या आवारातील विविध विभागांमध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी चढाओढ असते. या योजनेंतर्गत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति तास ४५ रुपये याप्रमाणे मानधन दिले जाते. दररोज तीन तास काम करण्याची मुभा आहे. अनेक गरजु विद्यार्थ्यांना त्यांचा दैनंदिन खर्च भागविण्यासाठी याची मदत होते. महिनाभरात संबंधित विद्यार्थ्याने किती तास काम केले, त्याआधारे एकत्रित रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. पण या प्रक्रियेमध्ये मोठा घोळ झाल्याचे समोर आले आहे. या योजनेचा नियमित आढावा घेताना या प्रकाराचा उलगडा झाला आहे. विद्यार्थ्यांना मानधन वितरित करताना काही अनियमितता दिसून आली असून ही बाब गंभीर असल्याचे विद्यापीठाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे तातडीने या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी विद्यार्थी कल्याण मंडळाच्या कार्यालयातील काही कागदपत्रे प्रशासनाने ताब्यात घेतल्याचे समजते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली असून ही समिती सर्व कागदपत्रांची तपासणी करणार आहे. विद्यापीठाची चौकशी समितीविद्यापीठाच्या अंतर्गत प्रक्रियेचा भाग म्हणून सर्वच योजनांचा नियमित आढावा घेतला जातो. त्यानुसार ‘कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका योजने’चा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना मानधन वितरित करतांना काही आर्थिक अनियमितता झाल्याचे आढळून आले आहे. या सर्व प्रकरणाची विद्यापीठाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल पुढील ३ आठवड्यांत मिळेल.- प्रभाकर देसाई, संचालक विद्यार्थी विकास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठPuneपुणेEducationशिक्षण