महिलेची पावणे सहा लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:11 IST2021-07-07T04:11:52+5:302021-07-07T04:11:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : विश्वास संपादन करून महिलेकडून ५ लाख ७५ हजार रुपये घेऊन परत न करता तिची ...

Fraud of Rs | महिलेची पावणे सहा लाखांची फसवणूक

महिलेची पावणे सहा लाखांची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : विश्वास संपादन करून महिलेकडून ५ लाख ७५ हजार रुपये घेऊन परत न करता तिची आर्थिक फसवणूक केली. पैसे परत मागितल्याने महिलेला जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी हलिमा लालसाहेब शेख (वय २६, रा. नाना पेठ) यांनी समर्थ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुरेश सुबराव भालेराव (वय ४७), सुरेखा सुरेश भालेराव (वय ४०), मयूर सुरेश भालेराव (वय ३०, सर्व रा. के.के.वस्ती, सिंहगड रोड) आणि अन्य एकावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हलिमा यांची आई आणि आरोपी भालेराव कुटुंबीय यांच्यात ओळख आहे. भालेराव यांनी हलिमा यांच्या आईचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून ६ महिन्यांत पैसे परत करण्याच्या बोलीवर ५ लाख ७५ हजार रुपये घेतले. मात्र, त्यानंतर त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. पैसे परत मागितल्याचा रा. मनात धरून भालेराव कुटुंबीयांनी हलिमा यांच्या आईला जिवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी यांनी न्यायालयात खासगी दावा दाखल केला होता. न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Fraud of Rs