शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चलनातून बाद झालेल्या 1 हजाराच्या नोटा दाखवून लाखोंची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 01:47 IST

लष्करातील कर्मचाऱ्याला अटक, २७ लाख ३५ हजारांचा ऐवज जप्त

ठळक मुद्देदरोडा व वाहनचोरीविरोधी पथकातील सहायक पोलीस फौजदार तानाजी कांबळे यांना आण्णासाहेब धायतिडक हा जुन्या १ हजार रुपयांच्या बाद झालेल्या नोटा तसेच नकली नोटा घरी बाळगून असल्याची माहिती मिळाली

पुणे : नोटाबंदीमध्ये चलनातून बाद केलेल्या १ हजार रुपयांच्या नोटा दाखवून त्या बदलून देतो, असे सांगून लाखो रुपयांना गंडा घालणारी टोळी पुणे पोलिसांनी उघडकीस आणली असून लष्करातील कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. आण्णासाहेब अर्जुन धायतिडक (रा. रेंजहिल्स, शासकीय निवासस्थान, खडकी, मूळ गाव बार्शी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून चलनातून बंद झालेल्या १ हजार रुपयांच्या ५६ नोटा, भारतीय मनोरंजन बँक, व ५०० रुपयांसारख्या दिसणाऱ्या बनावट नोटा, मोटार असा एकूण २७ लाख ३५ हजार ५४० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

दरोडा व वाहनचोरीविरोधी पथकातील सहायक पोलीस फौजदार तानाजी कांबळे यांना आण्णासाहेब धायतिडक हा जुन्या १ हजार रुपयांच्या बाद झालेल्या नोटा तसेच नकली नोटा घरी बाळगून असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शुक्रवारी रेंजहिल्स येथील धायतिडक याच्या घरावर छापा घालून या बाद झालेल्या व बनावट नोटा ताब्यात घेतल्या. त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्यांची ही एक टोळीच असल्याचे उघडकीस आले आहे. धायतिडक हा लष्करात कामाला असून तो दीर्घ रजेवर आल्यानंतर पुन्हा ड्युटीवर गेला नसल्याचे समजते. त्याचा साथीदार नवाब अली हा आपण चित्रपटसृष्टीत काम करत असून शूटिंगसाठी अशा नोटा वापरत असल्याचे दाखवत असे. दरम्यान, दरोडा व वाहनचोरीविरोधी पथकाने धायतिडक याला अधिक तपासासाठी खडकी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

असा रचत असत फसवणुकीचा कटही टोळी एखादे सावज हेरत त्याला एक केंद्र सरकारचे बनावट अध्यादेश दाखवत. आमच्याकडे १ हजार रुपयांच्या बनावट नोटा असल्याचे सांगून ते एक व्हिडीओ दाखवत. त्यात ते बनावट नोटांच्या बंडलावर सर्वात वर एक हजार रुपयांची जुनी बाद झालेली नोट लावून लावत. त्यानंतर त्यांना एखाद्या बँकवाल्याला शोधायला सांगत. बँकर आणि २ हजार रुपयांच्या खऱ्या नोटा आणल्यास मोठा आर्थिक फायदा होणार असल्याचे सांगत. त्यानंतर सर्व व्यवहार करून देतो, आम्हाला त्याबदल्यात कमिशन द्यावे लागेल, असे सांगून त्यांच्याकडून कमिशनच्या नावाखाली लाखो रुपये लुटत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी पुण्यातील एकाला अशाच प्रकारे फसवून त्यांच्याकडून कमिशनपोटी तब्बल ४ लाख रुपये लुबाडले होते. साताऱ्यामध्येही त्यांनी एकाला अशाच प्रकारे लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी