शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Pune: चारधाम यात्रेचे आश्वासन देवून फसवणूक; ट्रॅव्हल्स कंपनीतील तिघांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 15:10 IST

स्वस्तात परदेशी सहलीचे दाखवतात आमिष...

धायरी (पुणे) : ५६ हजार रुपये घेवूनही चारधाम यात्रा न घडविता एका व्यक्तीची फसवणूक केल्याप्रकरणी धायरी येथील  ट्रॅव्हल्स कंपनीच्या तीन जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ड्रिमकास्टर टूर्स अँड ट्रॅव्हर्ल्स या ट्रॅव्हल्सचे ऋषिकेश रामचंद्र भडाळे, संकेत रामचंद्र भडाळे व सुप्रिया संकेत भडाळे (सर्व राहणार : धायरी, पुणे) अशी या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी रंजित तुलशीदास पवार (वय: ३८ वर्षे, रा. मु.पो. निगडी जि. सातारा) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. २६ फेब्रुवारी रोजी धायरी येथील अजिंक्यतारा मित्र मंडळाजवळ असलेल्या ड्रिमकास्टर टूर्स अँड ट्रॅव्हर्ल्स या ट्रॅव्हल्सच्या ऑफिसमध्ये ऋषिकेश रामचंद्र भडाळे यांनी तक्रारदार यांच्याकडून चारधाम यात्रेसाठी बुकींग म्हणून एकवीस हजार रुपये घेतले. त्यानंतर चारधाम यात्रेसाठी संकेत रामचंद्र भडाळे यांनी वेगवेगळे मेसेजेस पाठवुन तक्रारदार यांचा विश्वास संपादन केला. तसेच संकेत भडाळे यांनी त्यांची पत्नी सुप्रिया यांच्या खात्याचा क्यूआर कोड पाठवून त्यावर उर्वरित पस्तीस हजार रुपये पाठवण्यास सांगितले. दरम्यान एकूण छप्पन हजार रुपये घेऊनही चारधाम यात्रा न पुरविता विश्वासघात करून फसवणूक केल्याने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक भरत चंदनशिव करीत आहेत. 

स्वस्तात परदेशी सहलीचे दाखवतात आमिष... बरेच जण सुट्टी पडण्याआधीच पिकनिकचा बेत आखतात. केवळ देशातच नव्हे तर परदेशातही जाण्यास लोक वाढती पसंती देत आहेत. याचाच गैरफायदा उठवणाऱ्या मंडळींनी डोके वर काढले आहे. असा टूरचा बेत आखणाऱ्या लोकांनी टूर पॅकेज करताना सावध राहण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे. सध्या काही बनावट ट्रॅव्हल कंपन्या स्वस्तात परदेशी सहलीचे आमिष दाखवून फसवणूक करत असल्याच्या घटना समोर येत आहेत.

धायरीतील या ट्रॅव्हल्स कंपनीने  १४५ जणांना गंडा घातल्याचे समोर येत असून जवळपास ४० लाखाहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचे आढळून आले आहे. यातील मुख्य आरोपी संकेत भडाळे याला पोलिसांनी अटक केली आहे . आणखी कुणाची फसवणूक झाली असल्यास सिंहगड रस्ता पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक भरत चंदनशिव यांनी केले आहे.

टॅग्स :Sinhagad Road Policeसिंहगड रोड पोलीसPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी