शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल मॅनेजमेंटची नोकरी लावून देतो असे सांगून '२ लाखांची' फसवणूक; किरण गोसावीवर भोसरीत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 15:26 IST

फिर्यादीने नोकरी मिळावी म्हणून त्यांनी ऑनलाईन ॲप्लीकेशन केले होते

पिंपरी : परदेशात ब्रुनेई येथे हॉटेल मॅनेजमेंटची नोकरी लावून देतो असे सांगून सव्वादोन लाखांची फसवणूक केली. या प्रकरणी किरण प्रकाश गोसावी (वय ३६, रा. ठाणे) याच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजयकुमार सिद्धलिंग कानडे (वय ३३, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी. मूळ रा. लातूर) यांनी याप्रकरणी गुरुवारी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी २०१५ मध्ये नोकरी शोधत होते. नोकरी मिळावी म्हणून त्यांनी ऑनलाईन ॲप्लीकेशन केले होते. तसेच विविध जॉब पोर्टल वरून त्यांना नोकरीसाठी ऑफर येत होत्या. २१ मार्च २०१५ ला विजयकुमार कानडे यांना मेल आला. परदेशात हॉटेल मॅनेजमेंटची नोकरी असल्याचे नमूद केले होते. त्यासाठी कानडे यांचा बायोडेटा मागवण्यात आला. कानडे यांनी त्यांचा बायोडेटा मेलद्वारे पाठविला.गोसावी याने कानडे यांना ब्रुनेई येथे नोकरी लावतो, असे सांगितले. कानडे यांचा विश्वास संपादन करून नाशिक फाटा कासारवाडी येथे भेटून ३० हजार रुपये रोख स्वरूपात घेतले. त्यानंतर कानडे यांनी ५ एप्रिल २०१५ ला शिवा इंटरनॅशनल, माजीवाडा, ठाणे येथील कार्यालयात जाऊन किरण गोसावीला ४० हजार रुपये दिले.

किरण गोसावीच्या सांगण्यावरून एका बँक खात्यावर कानडे यांनी २० हजार रुपये पाठवले. वैद्यकीय तपासणीसाठी किरण गोसावी याच्या ठाणे येथील ऑफिसमध्ये जाऊन कानडे यांनी १० हजार रुपये भरले. वेळोवेळी रोख तसेच ऑनलाईन स्वरूपात दोन लाख २५ हजार रुपये कानडे यांनी आरोपी किरण गोसावी याला दिले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसAryan Khanआर्यन खानCrime Newsगुन्हेगारीArrestअटक