शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

अकरा वर्षांपासून फ्लॅटचा ताबाच न देता चौदा कोटींची केली फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 19:02 IST

याप्रकरणी हडपसर येथे राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे...

ठळक मुद्देबिल्डर ललितकुमार जैन यांच्यासह आणखी दोघांवर गुन्हा दाखल२४ फ्लटचे पैसे घेऊन  अन्य कामांकरिता केला वापरही घटना २७ मे २००९ ते १५ मे २०१९ दरम्यान

पुणे : ग्राहकांकडून २४ फ्लँटकरिता १३ कोटी ४० लाख ८९ हजार ५२४ रुपये घेऊन तब्बल अकरा वर्षांपासून फ्लँटचा ताबा न देणाऱ्या कुमार प्रॉपर्टीजचे बिल्डर ललितकुमार जैन यांच्यासह झेंडर कंपनीचे राकेश शहा व अपर्णा गोयल यांच्यावर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी हडपसर येथे राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे. अद्याप कुणाला अटक केली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २७ मे २००९ ते १५ मे २०१९ दरम्यान घडली. फिर्यादीं यांनी ४५ निर्वाण हिल्स या प्रोजेक्ट मधील १४ व्या मजल्यावरील ६०१ क्रमांकाचा फ्लँट याबरोबरच तळमजल्यावरील पार्किंग हे नोंदणीकृत दस्तानुसार ८ मार्च २०१० रोजी १ कोटी ९ लाख ९२ हजार ९७५ रुपयांना खरेदी केले. करार नाम्यानंतर फियार्दी यांची सुन यांच्या बँक खात्यावरुन २२ लाख रुपये व फिर्यादी यांनी कर्ज घेतलेल्या रक्कमेतील ५७ लाख १७ हजार ४११ असे मिळून ७९ लाख १७ लाख ४११ रुपयांची रक्कम आरोपी यांच्या बँकेतील खात्यावर जमा केली. मात्र त्यांनी ती रक्कम फ्लँट करिता न वापरता इतर कामासाठी वापरली. तसेच फिर्यादीला दिलेल्या मुदतीनुसार फ्लॅटचा ताबा करारनाम्याप्रमाणे २०१३ मध्ये देय असताना तो दिला नसल्याचे दिसून आले.बरोबरच इतर २३ ग्राहकांकडून आरोपी यांनी फ्लॅटपोटी १३ कोटी ४० लाख ८९ हजार ५२४ रुपये घेतले आहेत. त्यांनी हे पैसे फ्लँटसाठी वापरले नसल्याचे तक्रारीत नमुद केले आहे.  व इतर साक्षीदार यांना ताबा वेळेत न दिल्यामुळे बिल्डरने त्यांच्याकडून प्राप्त रकमेवर व्याज देणे बंधनकारक असताना ते त्यांना अद्याप देण्यात आलेले नाही.  फिर्यादीं व इतर साक्षीदार यांना फ्लॅट बुक करताना दाखविलेल्या नकाशात त्यांच्या संमतीशिवाय आरोपींनी परस्पर फेरबदल केले आहेत. अशाप्रकारे फिर्यादी व इतर साक्षीदारांची १४ कोटी २० लाख ६ हजार ९३५ रुपयांची रक्कम दोन्ही डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी व तिच्या संचालकांनी अन्य कामाकरिता वापरली असून याप्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादींनी तक्रार अर्जात म्हटले आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी करीत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीPoliceपोलिस