शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

बनावट रेमडेसिविरची विक्री करणाऱ्या चौघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 21:42 IST

बारामती ग्रामीण पोलिसांनी उघड केला होता प्रकार 

बारामती : रेमडेसिविर इंजेक्शनच्या मोकळ्या बाटलीत पॅरासिटीमॉल भरुन काळ्या बाजारात विक्री केल्याचा प्रकार बारामती ग्रामीण पोलीसांनी काही दिवसांपुर्वीच उघड केला होता.पोलिसांनी सापळा रचुन शुक्रवारी(दि १६) एमआयडीसीत पेन्सिल चौकात त्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या.रेमडेसिविर च्या तुटवड्याचा फायदा घेवुन हा प्रकार सुरु होता.आता या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चौघा जणांवर तालुका पोलिसांनी मंगळवारी(दि २०) सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,दिलीप ज्ञानदेव गायकवाड (रा. काटेवाडी, ता. बारामती), संदीप संजय गायकवाड (रा. भिगवण, ता. इंदापूर), प्रशांत सिध्देश्वर धरत (रा. भवानीनगर, ता. इंदापूर) व शंकर दादा भिसे (रा. काटेवाडी, ता. बारामती) अशी चौघाजणांची नावे आहेत.याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाचे निरीक्षक विजय नगरे यांनी फिर्याद दिली आहे. 

पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी सांगितले, बारामती शहरातील  गोरड हॉस्पिटलमधील स्वप्नील जाधव (रा. फलटण, जि. सातारा) या रुग्णाला हे बनावट रेमडेसिव्हीर इंजेक्शन दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा जबाब डॉ. गोरड यांनी पोलिसांना दिला आहे.त्यानंतर त्या चौघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आहे.

दरम्यान ,दवाखान्यात रिकाम्या झालेल्या बाटल्या संदीप गायकवाड गोळा करत असे. त्यात पॅरासिटीमॉल भरुन त्या रेमडेसिविरच्या ओरिजनल बाटल्या असल्याचे भासवले जायचे. दिलीप गायकवाड हा हेल्थ इन्शुरन्सचे काम करत असल्याने त्याच्याकडे या इंजेक्शनबाबत नातेवाईक चौकशी करीत असत. संबंधित नातेवाईकांना जादा दराने हे इंजेक्शन देण्याचे काम गायकवाड हा प्रशांत धरत व शंकर भिसे यांच्या मार्फत करत असल्याचे पोलीसांनी केलेल्या तपासात उघड झाले आहे.बनावट रेमडेसिविरमुळे परिसरात खळबळ उडाली होती.पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.

या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, या चौघांनी किती जणांना ही बनावट इंजेक्शन्स दिली , कोणत्या आणि किती रुग्णांना ती देण्यात आली आहेत, याबाबत पोलिस मुळाशी जाऊन तपास करत आहेत. प्रकरणात सहभागी सर्वांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी सांगितले.त्यामुळे या प्रकरणाकडे बारामतीकरांचे लक्ष वेधले आहे.————————————————

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक