शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लिलावातून डीएसकेंची  ‘‘ती’’ चार वाहने वगळा:  न्यायालयाचा आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 20:56 IST

डीएसके व त्यांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केलेल्या 20 वाहनांपैकी 13 वाहनांचा लिलाव

ठळक मुद्देदोन बीएमडब्ल्यु, पोर्शे आणि टोयोटाच्या एका वाहनाचा समावेशवाहनांची किंमत दोन कोटी 57 लाख 50 हजार रुपये

पुणे : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांची चार महागडी वाहने सध्या लिलावातून वगळावीत असा आदेश बुधवारी न्यायालयाने दिला आहे. शनिवारी (ता. 15) या वाहनांचा लिलाव होणार होता.स्थगिती दिलेल्या वाहनांमध्ये दोन बीएमडब्ल्यू, एक पोर्शे आणि टोयोटा कंपनीच्या एका वाहनाचा समावेश आहे. या वाहनांच्या नोंदणीबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे(आरटीओ) चौकशी करून त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. डीएसके व त्यांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केलेल्या 20 वाहनांपैकी 13 वाहनांचा लिलाव करण्याची करण्याची परवानगी यापूर्वी न्यायालयाने दिली आहे. या वाहनांची किंमत दोन कोटी 57 लाख 50 हजार रुपये आहे. लिलाव करण्यात येत असलेली काही वाहने डीएसके यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांच्या मालकीची आहेत, असे यापूर्वी न्यायालयाने दिलेल्या आदेशात नमूद आहे. मात्र प्रत्यक्षात त्यातील आठ वाहने डीएसके मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि डीएसके डेव्हलपर्स लिमिटेड या दोन कंपन्यांच्या मालकीची आहेत. त्यांचा लिलाव करण्याचा अधिकार आत्ता सुनावणी सुरू असलेल्या न्यायालयास नाही तर राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाला आहेत. त्यामुळे हा लिलाव रद्द करावा किंवा संबंधित आठ गाड्या वगळून लिलाव करावा, अशी मागणी करणारा अर्ज शिरीष कुलकर्णी यांचे वकील प्रतीक राजोपाध्ये आणि आशिष पाटणकर यांनी न्यायालयात केला होता.

लिलावातून डीएसकेंची  ‘‘ती’’ चार वाहने वगळा  :  न्यायालयाचा आदेश  दोन बीएमडब्ल्यु, पोर्शे आणि टोयोटाच्या एका वाहनाचा समावेश

पुणे : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांची चार महागडी वाहने सध्या लिलावातून वगळावीत. असा आदेश बुधवारी न्यायालयाने दिला आहे. शनिवारी (ता. 15) या वाहनांचा लिलाव होणार होता.स्थगिती दिलेल्या वाहनांमध्ये दोन बीएमडब्ल्यू, एक पोर्शे आणि टोयोटा कंपनीच्या एका वाहनाचा समावेश आहे. या वाहनांच्या नोंदणीबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) चौकशी करून त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. डीएसके व त्यांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केलेल्या 20 वाहनांपैकी 13 वाहनांचा लिलाव करण्याची करण्याची परवानगी यापूर्वी न्यायालयाने दिली आहे. या वाहनांची किंमत दोन कोटी 57 लाख 50 हजार रुपये आहे. लिलाव करण्यात येत असलेली काही वाहने डीएसके यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांच्या मालकीची आहेत, असे यापूर्वी न्यायालयाने दिलेल्या आदेशात नमूद आहे. मात्र प्रत्यक्षात त्यातील आठ वाहने डीएसके मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि डीएसके डेव्हलपर्स लिमिटेड या दोन कंपन्यांच्या मालकीची आहेत. त्यांचा लिलाव करण्याचा अधिकार आत्ता सुनावणी सुरू असलेल्या न्यायालयास नाही तर राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाला आहेत. त्यामुळे हा लिलाव रद्द करावा किंवा संबंधित आठ गाड्या वगळून लिलाव करावा, अशी मागणी करणारा अर्ज शिरीष कुलकर्णी यांचे वकील प्रतीक राजोपाध्ये आणि आशिष पाटणकर यांनी न्यायालयात केला होता.

 

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीD.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीPoliceपोलिस