शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यात साडे चार हजार बालके व्याधिग्रस्त; आरोग्य विभागाच्या तपासणीत माहिती उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 20:20 IST

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियातंर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातून (आरबीएसके) मोहिमेत या बालकांची आरोग्य तपासणी व उपचार करण्यात येत आहे.

पुणे : जिल्हा परिषदेच्याआरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण भागात केलेल्या लहान मुलांच्या तपासणी व सर्वेक्षणात जिल्ह्यात तब्बल 4 हजार 768 मुले विविध व्याधिग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियातंर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातून (आरबीएसके) मोहिमेत या बालकांची आरोग्य तपासणी व उपचार करण्यात येत आहे.

ग्रामीण भागातील शंभर टक्के लहान मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. आरबीएसके कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील 3 लाख 35 हजार बालकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. त्यातील आत्तापर्यंत 2 लाख 31 हजार 195 बालकांची तपासणी पूर्ण झाली. या बालकांची संपूर्ण माहिती चाईल्ड हेल्थ ट्रॅकींग सिस्टिममध्ये नोंदविली जात आहे. यात 4 हजार 768 बालकांना विविध आजार असल्याची माहिती समोर आली. त्यात 233 बालकांना जन्मजात व्यंग असून, कान-नाक-घशाचे आजार असलेल्या बालकांची संख्या दोन हजार 21 आहे. विविध आजारांचे एकूण चार हजार 768 मुले आढळली आहेत.

अंगणवाडी आणि शालेय विद्यार्थ्यांची शाळेत जाऊन आरोग्य तपासणी केली जात आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे काही प्रमाणात खंड पडला होता. आता पुन्हा एकदा मोहीम स्वरूपात आरोग्य तपासणी केली जात आहे. बालकांना अंगणवाडी केंद्रांतील ताई आणि अशा वर्कर यांच्यावर बालकांना आणून त्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. 

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियातंर्गत शालेय विद्यार्थी आणि बालकांच्या आरोग्य तपासणीत कर्करोग (कॅन्सर) आणि हृदयाला छिद्र असलेल्या मुलांवर (सीएचडी, व्हिएसडी) मुंबईत उपचार केले जाणार आहे. तसेच इतर आजाराचे निदान झाल्यास त्याचे संपूर्ण उपचार पुणे जिल्ह्यातील पाच वैद्यकीय महाविद्यालये निश्चित करण्यात आली. त्याठिकाणी उपचार केले जाणार आहे. जन्मजात व्यंग असलेले 233, बालकांचे आजार 325, कमकुवत एक हजार 345, कान-नाक-घशाचे आजार असलेल्या बालकांची संख्या दोन हजार 21, डोळ्यांचे आजार 1290 बालकांना असून, 554 जणांना त्वचा विकार असल्याची माहिती आतापर्यंच्या पहाणीतून समोर आली आहे. 

कुपोषण मुक्तीसाठी विशेष मोहिम 

''राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियातंर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातंर्गत बालकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. यातून आजारी आढळत असलेल्या बालकांना आवश्यक ते उपचार आणि पोषण पुरविण्यात येणार आहे. उर्वरित बालकांचे तपासणी केली जात असून, सर्व बालकांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर पंधरा दिवसांचे विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार आहे असे पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांनी संगीतले.'' 

टॅग्स :zpजिल्हा परिषदdocterडॉक्टरhospitalहॉस्पिटलHealthआरोग्यcollectorजिल्हाधिकारी