छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राज्यस्तरीय स्पर्धांच्या आयोजनासाठी प्रत्येकी एक कोटींचा निधी देणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 21:42 IST2025-01-15T21:41:22+5:302025-01-15T21:42:05+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राज्यस्तरीय स्पर्धांच्या आयोजनासाठी प्रत्येकी एक कोटींचा निधी देणार
बारामती -
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राज्यात होणाऱ्या चार स्पर्धांच्या आयोजनासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी देण्यात येइल. पुढील वर्षापासून या घोषणेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची घोषण महत्वपूर्ण घोषणा उपमुख्मंत्री अजित पवार यांनी बारामती येथे केली.
बारामती येथील रेेल्वे मैदानावर आयोजित २३ व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी क्रिडामंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले, राज्यात आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने कबड्डी, खोखो,व्हाॅलीबाॅल,कुस्ती या स्पर्धांचे दरवर्षी आयोजन करतो. सुरवातीला या स्पर्धां आयोजनासाठी आपण राज्य सरकारच्या वतीने २५ लाख रुपये निधी दिला जात असे. त्यानंतर तो निधी ७५ लाखांपर्यंत वाढविण्यात आला.
आता राज्याचा अर्थमंत्री या नात्याने या चार स्पर्धांच्या आयोजनासाठी पुढील वर्षीपासून १ कोटी रुपये देणार असल्याचे जाहीर करतो. खेळ चांगला झाला पाहिजे,खेळाडुंना सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत,हा यामागे हेतू आहे. खेळाडुंना सोयीसुविधा उभा करण्याचे काम क्रिडा विभाग आणि राज्य सरकार करीत आहे. नवनिर्वाचित क्रिडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी क्रिडा विभागासाठी भरघोस निधी देण्याची मागणी केली आहे. त्याप्रमाणे राज्य सरकाच्या वतीने त्यासाठी सर्वाधिक निधी देण्याची घोषणा देखील यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी केली.
या कबड्डी स्पर्घेत राज्य सरकारच्या वतीने २० लाखांची बक्षीसे आहेत. तर यामध्ये बारामतीकरांच्या वतीने २५ लाखांची भर घालण्यात आली आहे. विजेत्यांना ४५ लाखांची बक्षीसे देण्यात येणार असल्याचे पवार म्हणाले. छत्रपती शहाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्श लाभलेली बारामती वैभवशाली इतिहासाची साक्षीदार आहे.
शहरात आयोजित क्रिडा स्पर्धंाना बारामतीकर मनापासून प्रतिसाद देतात.तसेच खेेळाडु देखील मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याचे गाैरवोदगार पवार यांनी काढले.यावेळी क्रिडामंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले,कबड्डी,कुस्ती हे ग्रामीण भागात आवडते खेळ आहेत.बारामतीत आयोजित या स्पर्धंत महिला आणि पुरुषांचे एकुण ३२ संघ आणि ६०० पेक्षा अधिक खेळाडु सहभागी झाले आहेत. यावेळी पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांनी जिंकण्यासाठी खेळ खेळण्याचा सल्ला दिला. राज्य कबड`उी असोसिएशनचे सहकार्यवाह बाबुराव चांदेरे यांनी प्रास्तविक केले.ज्ञानेश्वर जगताप यांनी सुत्रसंचालन केले. यावेळी स्पर्धेसाठी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे,पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे,खासदार सुप्रिया सुळे,खासदार सुनेत्रा पवार ,प्रशांत काटे, प्रशांत सातव, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी,मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी उपस`थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस या स्पर्धेसाठी येणार होते.मात्र,पंतप्रधान आज मुंबइ दाैर्यावर असल्याने त्यांच्या स्वागातासाठी ‘सीएम’ना प्रोटोकाॅलप्रमाणे थांबावे लागले.आम्ही मंत्री देखील पंतप्रधानांना विनंती करुन त्यांच्या परवानगीने मुंबइतून या स्पर्धेसाठी बारामतीत पोहचलो.तसेच मुख्यमंत्री दावोस दाैर्यावर जाणार असल्याने बारामतीत रविवारी(दि १९) या स्पर्धेच्या बक्षीस समारंभासाठी उपस`थित राहु शकणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.