शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यात चोरी करणारे चौघे जेरबंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 15:05 IST

कोपरगाव येथून येऊन पुणे, दौंड आणि अहमदनगर येथील रेल्वे स्टेशनमध्ये लांब पल्यांच्या गाड्यांमध्ये चोरी करणाऱ्या चौघांना लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले.

ठळक मुद्देलोहमार्ग पोलिसांनी कामगिरी : तीन गुन्हे उघड१ लाख ३४ हजार रुपयांचे १७ मोबाईल व सोनसाखळी हस्तगत

पुणे :  कोपरगाव येथून येऊन पुणे, दौंड आणि अहमदनगर येथील रेल्वे स्टेशनमध्ये लांब पल्यांच्या गाड्यांमध्ये चोरी करणाऱ्या चौघांना लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. त्यांच्याकडून पुण्यातील तीन गुन्हे उघडकीस आले असून १ लाख ३४ हजार रुपयांचे १७ मोबाईल व सोनसाखळी हस्तगत केली आहे़ अहमदनगर, दौंड रेल्वे पोलीस ठाण्यातील आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे़ विकी बबनराव लांडगे (वय २९, रा. मुकुंदवाडी, जि. औरंगाबाद), राहुल राजू शिंदे (वय १९ रा. कोपरगाव, जि. अहमदनगर), अशोक बाबू लहाने (वय २२, रा़ शिंदेमळा, सावेडी, जि. अहमदनगर) आणि दीपक भगवान खाजेकर (वय ३०, रा़ हारेगाव, ता. श्रीरामपूर, जि. अहमदगनर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत दिलखुशकुमार महेश पासवान (वय २२, रा. बिहार) याने फिर्याद दिली आहे. हा प्रकार दानापूर -पुणे एक्सप्रेसमधील बोगीमध्ये ८ आॅगस्ट रोजी पहाटे ५ वाजून ५५मिनिटांनी घडला होता़  पासवान प्रवास करून रेल्वेतून उतरत असताना झालेल्या गर्दीदा फायदा घेऊन त्याचा १० हजार रुपयांचा मोबाईल लांबविण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर कोपरगाव येथून येऊन काही जण मोबाईल आणि बॅग चोरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा लोहमागचे पोलीस निरीक्षक अनिल दबडे यांना खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार पुणे ते हावडा एक्सप्रेसच्या जनरल डब्यात सापळा रचून पोलिसांनी कारवाई करत चौघांना अटक केली. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडे तपास करून पुणे रेल्वे स्टेशन येथे घडलेले तीन गुन्हे उघडकीस आणले. १७ मोबाईल, ५ ग्रॅमची सोनसाखळी असा १ लाख ३४ हजार ९०० रुपयांचा ऐवज जप्त केला. अहमदनगर आणि दौंड येथे घडलेले आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल दबडे, पोलीस उपनिरीक्षक बबन गायकवाड, पोलीस हवालदार अनिल दांगट, पोलीस नाईक अमरदीप साळुंके, संतोष चांदणे, जर्नादन गर्जे, पोलीस कर्मचारी नीलेश बिडकर, राजेश कोकाटे, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, पवन बोराटे, संदीप पवार, भिसे, गाडे, चालक हवालदार जगदीश सावंत आणि खोत यांनी ही कारवाई केली़ 

 

टॅग्स :PuneपुणेArrestअटकPoliceपोलिसcrimeगुन्हे