सुनेचा छळ केल्याप्रकरणी माजी आमदार बाळासाहेब शिवरकर यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:11 IST2021-05-10T04:11:52+5:302021-05-10T04:11:52+5:30

पुणे : सुनेचा छळ केल्याप्रकरणी माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, त्यांचा मुलगा माजी नगरसेवक अभिजित यांच्यासह चौघांविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा ...

Four persons, including former MLA Balasaheb Shivarkar, have been booked for harassing Sune | सुनेचा छळ केल्याप्रकरणी माजी आमदार बाळासाहेब शिवरकर यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल

सुनेचा छळ केल्याप्रकरणी माजी आमदार बाळासाहेब शिवरकर यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल

पुणे : सुनेचा छळ केल्याप्रकरणी माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, त्यांचा मुलगा माजी नगरसेवक अभिजित यांच्यासह चौघांविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बाळासाहेब ऊर्फ चंद्रकांत शिवरकर (वय ६९), मुलगा अभिजित (वय ३८), सासू कविता (वय ६६) आणि सोनाली सिद्धार्थ परदेशी (वय ४०) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी त्यांच्या सुनेने वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार वानवडीतील लॉरेन्स कॉलनीत नोव्हेंबर २००९ ते एप्रिल २०१९ दरम्यान सुरू असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

फिर्यादी यांचे लग्न झाल्यापासून त्यांना मधुमेह असल्यामुळे तसेच त्यांच्या पतीचे संबंधावरून फिर्यादी यांनी जाब विचारल्यामुळे मारहाण करून छळ करण्यात आला. तसेच मारण्याची धमकी देऊन मानसिक व शारीरिक छळ करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Four persons, including former MLA Balasaheb Shivarkar, have been booked for harassing Sune