शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

येरवड्यातील संदीप देवकर खूनप्रकरणी चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 01:43 IST

हातगाडी लावण्याचा वाद : खुनाचा मुख्य सूत्रधार अजूनही फरार

विमाननगर : हातगाडी लावण्याच्या वादातून येरवड्यात झालेल्या खूनप्रकरणी येरवडा पोलिसांनी गुरुवारी चौघांना अटक केली. संदीप ऊर्फ अण्णा सुभाष देवकर (वय ४९, रा. नवी खडकी येरवडा) यांचा रविवारी (दि. ५) रोजी डोक्यात रिव्हॉलवरने गोळ्या घालून व तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. या खुनाच्या गंभीर गुन्ह्यात गणेश शांताराम चौगुले ऊर्फ बोरकर (वय २४, सुभाषनगर येरवडा), विशाल नागनाथ कांबळे (वय २२, लक्ष्मीनगर, येरवडा), रोहित प्रकाश कोळी (वय २६, रा. गणेशनगर येरवडा), मयूर सुनील सूर्यवंशी (वय २५, रा. रविवारपेठ पुणे) या चौघांना पुणे स्टेशन परिसरातून सापळा रचून अटक करण्यात आली. गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार जावेद सय्यद व ओरोपी अशरफ पठाण हे दोघे अद्यापही फरार आहेत.

हातगाडी लावण्याच्या वादातून शनिवारी संदीप देवकर यांना गणेश चौगुले व जावेद सय्यद यांनी जिवे मारण्याची धमकी दिली होती. रविवारी (दि. ६) संदीप देवकर यांचा गणेश चौगुले व त्याच्या साथीदारांनी निर्घृण खून केला. या खुनामुळे येरवडा परिसरात खळबळ उडाली होती. खुनाचा गंभीर गुन्हा करून सर्व आरोपी फरार झाले होते. येरवड्यासह गुन्हे शाखेची पथके गुन्ह्याचा तपास करीत होती. पुणे शहरासह मुंबई व इतर ठिकाणी तपासासाठी पथके तैनात करण्यात आली होती. गुन्ह्यातील आरोपी गणेश चौगुले हा पुणे स्टेशन परिसरात येणार असल्याची माहिती येरवडा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून गणेशसह विशाल कांबळे, रोहित कोळी,मयूर सूर्यवंशी या चौघांना येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले. अधिक तपासात हा खुनाचा गुन्हा त्यांनीच केल्याची कबुली दिली.अपर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलिस उपायुक्त प्रसाद अक्कानवरु, सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते, गुन्हे निरीक्षक किरण बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुशील बोबडे, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गवारी, सहायक फौजदार बाळू बहिरट, पोलीस हावालदार अजिज बेग, हनमंत जाधव, संदीप मांजूळकर, पोलीस कर्मचारी सचिन रणदिवे, मनोज कुदळे, अशोक गवळी, नवनाथ मोहिते, पंकज मुसळे, सचिन पाटील, सुनील सकट, विष्णू सरवदे, सुनील नागलोत, समीर भोरडे, अजय पडोळे, राहुल परदेशी यांच्या पथकाने गुन्ह्याचा छडा लावला.

तब्बल चार दिवसांनंतर या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात येरवडा पोलिसांना यश आले. गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारासह इतर फरार आरोपींचा कसून तपास सुरूअसून, लवकरच फरार आरोपी देखील जेरबंद करण्यात येतील, अशी माहिती पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी दिली. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी