विनयभंग प्रकरणी चार जण ताब्यात

By Admin | Updated: May 20, 2017 05:00 IST2017-05-20T05:00:34+5:302017-05-20T05:00:34+5:30

गुनाट (ता. शिरूर) लगत कोळपेवाडी येथील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले असून पैकी एक आरोपी अल्पवयीन आहे.

Four people were arrested in the molestation case | विनयभंग प्रकरणी चार जण ताब्यात

विनयभंग प्रकरणी चार जण ताब्यात

- लोकमत न्यूज नेटवर्क

निमोणे : गुनाट (ता. शिरूर) लगत कोळपेवाडी येथील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले असून पैकी एक आरोपी अल्पवयीन आहे.
यासंदर्भात शिरूर पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १६ रोजी सायंकाळी ५.००दरम्यान कोळपेवाडी -गुनाट (ता. शिरूर) येथील एक अल्पवयीन मुलगी दुकानातून किराणा सामान घेऊन घरी येत असताना संदीप कारभारी कोळपे (वय २८), आबासो बाळासो कोळपे (वय २१), पांडुरंग मल्हारी आसवले (वय १९) व चौथा एक अल्पवयीन आरोपी (सर्वजण राहणार कोळपेवाडी -गुनाट, ता. शिरुर) यांनी संबंधित मुलीस लज्जा उत्पन्न होईल, असे अश्लील बोलून उसाच्या शेतात ओढण्याचा प्रयत्न केला. संबंधित मुलीच्या तक्रारीवरून शिरूर पोलिसांनी वरील आरोपींना तत्काळ ताब्यात घेऊन त्यांच्यावर भारतीय कायदा कलम ३५४ ( अ ), ३४१, ५०६, ३४यांसह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा -१२यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Four people were arrested in the molestation case