शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
7
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
8
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
9
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
10
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
11
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
12
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
13
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
14
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
15
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
16
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
17
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
18
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
19
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
20
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...

शहरात चार वर्षांत चारशे मातामृत्यू, सरासरी वर्षाला ५० मातांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 1:25 AM

शहरात गेल्या सात वर्षांत ३८८ मातांना आपले प्राण गमवावा लागला आहे. राज्यात एक लाखामागे तब्बल ५० वर मातांना आपले प्राण गमवावे लागत असल्याचे चित्र आहे.

विशाल शिर्के ।पुणे : शहरात गेल्या सात वर्षांत ३८८ मातांना आपले प्राण गमवावा लागला आहे. राज्यात एक लाखामागे तब्बल ५० वर मातांना आपले प्राण गमवावे लागत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात होणा-या मातामृत्यूपेक्षा अत्याधुनिक आरोग्यसेवा असलेल्या शहरातील मातामृत्यूचे प्रमाण चौपट आहे.गर्भारपणातील मृत्यू, प्रसूतीदरम्यान झालेला आणि प्रसूतीनंतर ३२ आठवड्यांच्या आत संबंधित मातेचा मृत्यू झाल्यास त्याला मातामृत्यू मानण्यात येतो. राज्यात २०१३-१४ ते २०१६-१७ या कालावधीत १ हजार ९८६ मातांचा मृत्यू झाला असल्याचे दिसून येत आहे. महापालिका क्षेत्र वगळून राज्यात यवतमाळ जिल्ह्यात २०१३ ते २०१६-१७ या चार वर्षांमध्ये तब्बल १४७ मातांचा मृत्यू झाला आहे. यवतमाळमध्ये २०१६-१७ मध्ये ६० हजार १०५ प्रसूती झाल्या होत्या, त्यापैकी १ हजार ९२७ सरकारी आणि खासगी रुग्णालयात ३ हजार ८९५ सिझेरियन शस्त्रक्रिया झाल्या होत्या. याच वर्षात येथे २७ मातांचा मृत्यू झाला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अजहर खान यांनी ही माहिती समोर आणली आहे.शहरातील गेल्या चार वर्षांतील आकडेवारी पाहिल्यास प्रत्येक वर्षी सरासरी पन्नासहून अधिक मातांचा मृत्यू होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या सात वर्षांत २०१५-१६ मध्ये सर्वाधिक ५३ मातामृत्यूंची नोंद शहरात झाली आहे. पुणे जिल्ह्याचा विचार केल्यास २०१३-१४ मध्ये ६६,४१७, तर १४-१५ मध्ये ६५,९९१ आणि १५-१६ मध्ये ६५,०३२ प्रसूती झाल्या. तसेच १६-१७ यावर्षी ७४,१४२ प्रसूतीची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे. त्या तुलनेत मातामृत्यूचे प्रमाण अनुक्रमे ११, १४, १० आणि ९ इतके आहे. शहरातील अत्याधुनिक सुविधा असूनदेखील पन्नास हजार प्रसूतीमागील मातामृत्यूचा आकडा चक्रावून टाकणारा आहे.रक्तस्राव, बाळंतपणात आलेले झटके, घरातील अस्वच्छतेमुळे अथवा संबंधित रुग्णालयातील चुकीच्या हाताळणीमुळे झालेला जंतूसंसर्ग, बाळाचे डोके मोठे असणे,रक्तक्षय, उच्च रक्तदाब अशाविविध कारणांमुळे मातामृत्यूचे प्रमाण अधिक आहे. बाळंतपणात मातेची वारंवार तपासणी केली पाहिजे. हिमोग्लोबिन, रक्तदाब याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लोहाच्या गोळ््या अथवा लस घेतली पाहिजे, अशी सूचना तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.> महाराष्ट्रात लाखामागे ६८ बालमृत्यूदेशात सर्वांत कमी मातामृत्यू असलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. लाखामागे राज्यात ६८ बालमृत्यू होतात. केरळ असून, त्यांचे प्रमाण लाखामागे ६१ ते ६२ इतके आहे.यापूर्वी २००९ ते २०११ या काळात राज्यातील मातामृत्यूचे प्रमाण ८७ इतके होते. रक्तक्षय, जंतूसंसर्ग ही एक महत्त्वाची बाब आहे. आरोग्य विभागाच्या १०८ या क्रमांकावर महिलांना याबाबत संपूर्ण मदत मिळते.>साल एकूण प्रसूती मातामृत्यू२०१०-११ ४८,३६८ ३७२०११-१२ ५३,०२४ ४३२०१२-१३ ५०,२९० ६४२०१३-१४ ५३,६९६ ५३२०१४-१५ ५१,४४३ ६६२०१५-१६ ४६,४५२ ५३२०१६-१७ ५०,७०० ४९आॅगस्ट २०१७ २१,७५१ २३>ग्रामीण भागातील रुग्णालयात एखाद्या महिलेला काही वैद्यकीय अडचण उद्भवल्यास तिला शहरातील रुग्णालयात पाठविले जाते. त्यामुळे येथील मातामृत्यूचा आकडा अधिक दिसत आहे. पूर्वी वाहतुकीच्या तितक्याशा सोयी नसल्याने शहरातील रुग्णालयात आणताना वाटेतच मातेचा मृत्यू झाल्याच्या घटना व्हायच्या. त्यात घट झाली आहे.- डॉ. मीनाक्षी देशपांडे, सहसचिव, इंडियन मेडिकल असोसिएशन, पुणे

टॅग्स :Deathमृत्यू