शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मुळा मुठेच्या आणखी चार प्रकल्पांना पुढील दीड महिन्यात मान्यता : प्रकाश जावडेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2019 15:13 IST

केंद्रीय पर्यावरण मंत्री मदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रकाश जावडेकर यांनी आज पुण्यातील वनभवन येथे मुळा मुठा नदी प्रदुषण मुक्त आढावा बैठक घेतली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

पुणे : काही वर्षांपासून रखडलेला मुळा मुठा प्रकल्प पर्यावरण मंत्री झाल्यानंतर तातडीने हाती घेतला. त्यात आता वेगाने कामे होत आहेत. भारत सरकार आणि पुणे महानगरपालिका यांचा संयुक्त प्रकल्प असून त्याकरिता केंद्राकडून 85 टक्के अनुदान देण्यात आले आहे. त्याचबरोबर जायकाकडून देखील देण्यात आलेले कर्ज केंद्रसरकार फेडणार आहे. मुळा मुठेच्या आणखी चार प्रकल्पांना पुढील दीड महिन्यात मान्यता मिळुन त्या कामांचे भूमीपुजन करणार असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. 

वनभवन येथे आयोजित मुळा मुठा नदी प्रदुषण मुक्त आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, याबरोबर पालिकेचे, वनविभागाचे, नदी विकास प्रकल्पाचे अधिकारी,बँकेचे सल्लगार उपस्थित होते. बैठकीत मुळा मुठा प्रकल्पाचा विस्तृत आढावा घेण्यात आला.  बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना जावडेकर म्हणाले, या प्रकल्पाचे नाव जायका असे म्हटले जाते. ते खरे नाही. हा भारत सरकार व पुणे महानगरपालिकेचा मुळा - मुठा शुध्दीकरण संयुक्त प्रकल्प आहे. त्याकरिता भारत सरकारने 85 टक्के अनुदान दिले असून जायका बँकेकडून कर्ज घेण्यात आले आहे. ते केंद्र सरकार फेडणार आहे. त्यामुळे ही मोदी सरकारची पुणेकरांसाठी मोदी देणगी आहे. आतापर्यंतच्या सर्व कामाचा आढावा घेतल्यानंतर बाणेरच्या प्रकल्पातील 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्याची पाहणी पुढील महिन्यात मुख्यमंत्री, खासदार,पालकमंत्री करणार आहेत. याबरोबरच आणखी चार प्रकल्पांना मान्यता येत्या दीड महिन्यात मिळणार असून त्याचे भूमीपुजन केले जाणार आहे. दरमहिन्याला सर्व कामांचा आढावा घेणार असल्याचे जावडेकर यांनी सांगितले. 

सर्व प्रश्नांना एकच उत्तर  ‘माहिती घेऊ न सांगतो’ बांधकामा वेळी नदी पात्रात टाकण्यात येणारा कचरा यावर 2016 मध्ये  ‘वेस्ट मँनेजमेंट नोटीफिकेशन’ जाहीर करण्यात आली असून त्याबद्द्ल तक्रार असल्यास कुणीही जनहित याचिका दाखल करुन शकतो. असेही जावडेकर म्हणाले. मुळा मुठा नदी पात्राचा विकास होत असताना होणारी अतिक्रमणे, मेट्रोच्या कामातून तयार होणारा राडारोडा हा देखील पुन्हा नदीपात्रात टाकला जात आहे. याबरोबरच विकासकामात नदीचे अरुंद झालेले पात्र याविषयी जावडेकर यांना विचारले असता त्यांनी यासर्व प्रश्नावर  माहिती घेऊन आपल्याला उत्तरे देतो. असे सांगितल्यावर पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली. 

टॅग्स :environmentवातावरणPuneपुणेPrakash Javadekarप्रकाश जावडेकरmula muthaमुळा मुठा