शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

जेवण न दिल्याने चौघांकडून हॉटेल व्यावसायिकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 5:44 PM

जेवण न दिल्याने चार जणांनी हॉटेल व्यावसायिकाला सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण

ठळक मुद्देनिगडीतील प्रकार : देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी : हॉटेल बंद झाल्यानंतर जेवण न दिल्याने चार जणांनी हॉटेल व्यावसायिकाला सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण केली. यात व्यावसायिक जखमी झाला. निगडी येथे सोमवारी (दि. ६) रात्री साडेअकराला  ही घटना घडली. जय तिमप्पा पुजारी (वय ४१, रा. निगडी गावठाण) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. ९) फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चार अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेअकराला फिर्यादी पुजारी त्यांचे हॉटेलचे पुढील गेट बंद करून हॉटेलमध्ये कामगारांसोबत आवराआवर करत होते. त्यावेळी चार अनोळखी आरोपी हॉटेलच्या मागील दाराने आले. त्यांनी पुजारी यांना जेवण मागितले. हॉटेल बंद झाले आहे. जेवण मिळणार नाही, असे पुजारी यांनी सांगितले. त्यामुळे चिडून चौघांनी पुजारी व त्यांच्या हॉटेलमधील कामगारांना शिवीगाळ केली. एका आरोपीने रस्त्यावरील सिमेंटचा ब्लॉक पुजारी यांच्या डोक्यात मारला. यात पुजारी जखमी झाले. तसेच कामगार प्रबास बिश्वास याला देखील मारहाण केली. अन्य आरोपींनी हॉटेलवर दगड मारून चारचाकी वाहनातून मुंबईच्या दिशेने पळून गेले. उपचारानंतर पुजारी यांनी गुरुवारी देहूरोड पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेhotelहॉटेलfoodअन्न