शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
3
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
4
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
5
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
8
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
9
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
10
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
11
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
12
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
13
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
14
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
15
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
16
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
17
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
18
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
19
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
20
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

एफटीआयआयचे चार विद्यार्थी बेमुदत उपोषणावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 10:21 IST

एफटीआयआय'च्या अवाढव्य प्रवेश परीक्षा शुल्क आणि दरवर्षी वार्षिक शैक्षणिक फी'मध्ये होणारी दहा टक्के वाढ याच्या निषेधार्थ संस्थेचे चार विद्यार्थी सोमवारपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

पुणे : एफटीआयआय'च्या अवाढव्य प्रवेश परीक्षा शुल्क आणि दरवर्षी वार्षिक शैक्षणिक फी'मध्ये होणारी दहा टक्के वाढ याच्या निषेधार्थ संस्थेचे चार विद्यार्थी सोमवारपासून बेमुदत उपोषणाला बसले  आहेत.  दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी (जेएनयू) चे विद्यार्थी हॉस्टेल शुल्कवाढी विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. आता हे आंदोलनाचे वारे एफटीआयआयमध्येही शिरले आहेत. एफटीआयआय च्या स्टुडंट असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, एफटीआयआयमध्ये 2013 नंतर दरवर्षी शैक्षणिक शुल्कामध्ये दहा टक्के वाढ करण्यात येत आहे. 2013 बॅचचे वार्षिक शुल्क 55380 रुपये एवढे होते. मात्र आगामी 2020 बॅच साठी हेच  शुल्क 1 लाख 18 हजार 320 रुपयांच्या घरात पोहोचले आहे. अचानक एवढी शुल्कवाढ करण्यात आली आहे. 2018 पासून कोलकाता येथील सत्यजीत रे  फिल्म व टेलिव्हिजन इन्स्टिट़्यूट आणि एफ टीआयआय पुणे या दोन्ही संस्था संयुक्त प्रवेश प्रक्रिया (जे. ई. टी) राबवितात.

 या प्रवेश परीक्षांचे शुल्क देखील या वेळी प्रचंड वाढविण्यात आले आहे . 2015 मध्ये प्रवेश परीक्षा शुल्क 1500 रुपये एवढे होते. 2020 प्रवेश परीक्षेसाठी 10,000 एवढे शुल्क आकारण्यात येणार आहे. या शुल्क वाढीमुळे सर्वसामान्य कुटुंबातील इच्छुक विद्यार्थी प्रवेश घेण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.     या शुल्क वाढी विरोधात तीन वर्षांपासून आव्हान करून सुद्धा या गोष्टीवर कोणत्याही प्रकारची उपाय योजना करण्यात आलेली नाही. यामुळे विद्यार्थ्यांनी बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दरवर्षी १० % शैक्षणिक शुल्क वाढ बंद करण्यात यावी आणि शुल्क कमी करण्यात यावे. तसेच प्रवेश परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे व तोपर्यंत संयुक्त प्रवेशप्रक्रिया (जे ई टी) बंद करण्यात यावी अशा आमच्या मागण्या असून, जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर हे उपोषण चालू राहील असा इशारा स्टुडंट असोसिएशनने दिला आहे.

टॅग्स :FTIIएफटीआयआयStudentविद्यार्थीStrikeसंपEducationशिक्षण