शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यात खळबळ! भीमा नदीपात्रात आढळले चार मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 19:07 IST

पुणे जिल्ह्यात चार मृतदेह आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे...

केडगाव (पुणे) : पारगाव (ता. दौंड) हद्दीतील भीमा चार दिवसांत नदीपात्रात (दि. १८ ते २२) पर्यंत चार मृतदेह सापडल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आज (२३ जानेवारी) पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी घटनास्थळाची पाहणी करून परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे उपस्थित होते.

सर्व मृतदेह तरुण असल्याने वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहे. पारगाव व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यात दोन पुरुष व दोन स्त्रियांचे मृतदेह असून, सर्व मृतदेह हे अंदाजे ३८ ते ४५ वयोगटातील आहेत. एका पुरुषाचा मृतदेह नदीपात्रातून काढण्याचे काम रविवारी  (दि. २२) रोजी उशिरा काढण्यात आला. एका पुरुषाच्या मृतदेहासोबत एक चावी तर महिलेच्या मृतदेहासोबत मोबाईल फोन व सोने खरेदीची पावती  सापडल्याचे यवत पोलिसांनी सांगितले. यावरून तपासाला दिशा मिळाली असून यवत पोलिसांनी तपासाची चक्रे अतिशय वेगाने फिरवली आहेत.

पाच दिवसांत चार मृतदेह-

पारगाव हद्दीत भीमा नदीपात्रात स्थानिक मच्छिमार मासेमारी करत असताना बुधवार दिनांक १८ रोजी एका स्त्रीचा मृतदेह त्यांना आढळून आला. तसेच परत  शुक्रवार दि. २० रोजी पुरुषाचा, शनिवार दि. २१ रोजी पुन्हा स्त्रीचा व रविवार दि. २२ रोजी एका पुरुषाचा मृतदेह असे सलग पाच दिवस ४ मृतदेह आढळून आले.भीमा नदीपात्रात पाच दिवसात चार मृतदेह सापडल्याने ही आत्महत्या की घातपात हा मोठा प्रश्नचिन्ह पोलीस यंत्रणे बरोबरच स्थानिकांनाही पडला आहे. एकावेळी सलग मृतदेह सापडण्याची ही पहिलीच वेळ असल्याने तर्क-वितर्काना उधाण आले आहे.

अजून मृतदेह सापडण्याची शक्यता?चार मृतदेह सापडले असून संबंधित पती-पत्नी जोडी आहेत, असा तर्क लढवला जात आहे. अजून त्यांची तीन मुले मुली सापडण्याची शक्यता असून नदीपात्रात शोधण्याचे काम सोमवारी रात्री उशिरापर्यंत चालू होते. महानगरपालिकेची रेस्क्यू टीम या ठिकाणी शोधण्याचे काम करीत आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस