शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोटाच्या दाव्यातील चार प्रकरणे एकाच वेळी निकाली : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 20:42 IST

घटस्फोटाच्या दाव्यातील चारही प्रकरणांची एकाच वेळी सुनावणी होवून शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात दावे निकाली काढण्यात आले. 

ठळक मुद्देसर्वोच्य न्यायालयाचे न्यायाधीश कुरीअन जोसेफ आणि न्यायाधीश संजय कौल यांनी ही प्रकरणे काढली निकाली

पुणे : पतीपासून घटस्फोट मिळावा, हुंडा मागत असल्याबाबत पत्नीने दाखल केलेली तक्रार, ही तक्रार रद्द करण्यासाठी पतीने दाखल केलेला दावा आणि घटस्फोटाचा खटला ओरिसाला चालविण्याची केलेली मागणी, अशा चारही प्रकरणांची एकाच वेळी सुनावणी होवून शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात दावे निकाली काढण्यात आले. सर्वोच्य न्यायालयाचे न्यायाधीश कुरीअन जोसेफ आणि न्यायाधीश संजय कौल यांनी ही प्रकरणे निकाली काढली. चारही खटले एकाच प्रकरणात वेगवेगळ्या ठिकाणी दाखल करण्यात आले होते. प्रतिभा आणि अभिषेक (नावे बदललेली) असे दावा दाखल केलेल्या दाम्पत्याचे नाव. प्रतिभा व अभिषेकचे २०१२ साली लग्न झाले होते. दोघेही मूळचे ओरिसाचे. मात्र कामानिमित्त ते मुंबईला राहत. दोघेही आयटी कंपनीत कामाला आहेत. लग्न झाल्यानंतर काही महिन्यांत त्यांच्यात वाद सुरू झाले होते. त्यामुळे २०१६ पासून ते विभक्त राहत. अभिषेक आपल्याकडे पैशाची मागणी करतो, अशी तक्रार प्रतिभा हिने आरोसीतील नाबआनापूर येथे दाखल केली. हा दावा रद्द करावा म्हणून अभिषेकने ओरिसा येथील उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. २०१७ साली प्रतिभाची पुण्याला बदली झाली. त्यावेळी त्यांचा वाद अगदी टोकाला गेल्याने प्रतिभाने पुण्यातील न्यायालयात अ‍ॅड. आम्रपाली कांबळे-कसबे यांच्यामार्फत घटस्फोटाचा दावा दाखल केला होता. मात्र खटल्यासाठी पुण्याला जाणे शक्य नसल्याने हे प्रकरण ओरिसा येथे चालविण्यात यावे, यासाठी अभिषेकने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पुण्यात कामाला आल्याने घटस्फोटाच्या दाव्यासाठी ओरिसाला जाणे शक्य नाही, अशी भूमिका प्रतिभाने घेतली होती. अभिषेक सर्वोच्च न्यायालयात गेल्याने सुनावणीपूर्वी न्यायालयाने दोघांना समुपदेशनासाठी पाठवले. त्यानुसार सुमपदेशक अ‍ॅड. व्ही. के. बिजू यांनी त्याचे सुमपदेशन केले. त्यावेळी दोघेही सहमतीने घटस्फोट घेण्यासाठी तयार झाले. त्यानंतर दोघांनी काही अटी मान्य केल्या. अटींची पूर्तता झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा घटस्फोट मान्य केला. त्यामुळे खटला दुसरीकडे पाठविण्याचा अर्ज, पत्नीने दाखल केलेली हुंड्याबाबतची तक्रार आणि ही तक्रार रद्द करण्यासाठी पतीने केलेला दावा, अशी सर्व प्रकरणे एकाच वेळी सर्वोच्च न्यायालयात निकाली लागली. सर्वोच्च न्यायालयातील अ‍ॅड. दीपलक्ष्मी मतवाणकर यांनी देखील या प्रकरणाचे कामकाज पाहिले. 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयDivorceघटस्फोट