शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

घोटाळ्याप्रकरणी आमदार अनिल भोसलेंसह चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 11:43 PM

पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

पुणे: शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील ७१ कोटी ७८ लाख रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी बँकेचे संचालक आणि विधान परिषदेचे राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्यासह चार जणांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून मंगळवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. या प्रकरणात १५ जणांवर गुन्हा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ९ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भोसले यांच्यासह बँकेचे संचालक सुर्याजी जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी पडवळ, बँकेचे अधिकारी शैलेश भोसले यांना अटक करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या २०१८-१९ च्या आर्थिक वषार्चे लेखापरीक्षण (ऑडिट) करण्याचे आदेश दिले होते. या लेखापरिक्षणात ७१ कोटी ७८ लाख रुपयांची तफावत आढळून आली होती. त्यानुसार, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सीए योगेश लाकडे यांच्या फियार्दीवरून अनिल भोसले यांच्यासह शैलेश भोसले, तानाजी पडवळ, विष्णू जगताप आणि हनुमान सोरते आदी पदाधिकाऱ्यांवर भारतीय दंड संहिता ४२०, ४६८, ४७१ आदी कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. भोसले यांच्यासह अन्य आरोपीने बँकेच्या अभिलेखमध्ये ७१ कोटी ७१ लाखांच्या केलेल्या बनावट नोंदी लेखपरिक्षणामध्ये उघड झाल्या होत्या.रिझर्व्ह बँकेकडून २६ एप्रिल २०१९ रोजी करण्यात आलेल्या विशेष तपासणीमध्ये कामकाजात अनियमितता असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आर्थिक अनियमिततेसह अन्य कारणांमुळे निर्बंध लादण्यात आले. संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासन नेमण्याचे आदेश देण़्यात आले. सहकार आयुक्त सतीश सोनी यांनी संचालक मंडळ बरखास्त केल्यानंतर प्रशासकाची नेमणूक केली ओती.बँकेच्या एकूण ठेवी ४३० कोटीबँकेचे एकूण कर्जवाटप ३१० कोटीअनुत्पादीत कर्ज २९४ कोटीएकूण शाखा १४ शाखाएकूण खातेदार १६ हजार

टॅग्स :fraudधोकेबाजी