भोरला राडा करणाऱ्या चौैघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 01:44 IST2018-07-10T01:44:28+5:302018-07-10T01:44:41+5:30

भोर तालुक्यातील निगुडघर येथे जेवायला आलेल्या पुण्यातील दोन गटांत झालेल्या बाचाबाचीतून गाडीच्या काचा फोडून एकाला धारदार शस्त्राने गंभीर जखमी करण्यात आले होते. याप्रकरणी भोर पोलिसांनी ६ पैकी ४ आरोपींना अटक केली.

four arrested | भोरला राडा करणाऱ्या चौैघांना अटक

भोरला राडा करणाऱ्या चौैघांना अटक

भोर - तालुक्यातील निगुडघर येथे जेवायला आलेल्या पुण्यातील दोन गटांत झालेल्या बाचाबाचीतून गाडीच्या काचा फोडून एकाला धारदार शस्त्राने गंभीर जखमी करण्यात आले होते. याप्रकरणी भोर पोलिसांनी ६ पैकी ४ आरोपींना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता १३ जूनपर्यंत ४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली असून येरवडा कारागृहात पाठविण्यात आले आहे. तर, २ आरोपी फरार आहेत.
दांडक्याने व चाकूने मारहाण करून फरार झालेल्या सागर खंडू खाटपे (वय ३०), आशिष अशोक शिंदे (वय ३२), सुरेश नारायण जाणकर (वय ३३, सर्व रा. पापळवस्ती बिबवेवाडी, पुणे), सचिन सोपान जाधव (वय ३१, रा. कांजळे, ता. भोर) यांना भोर पोलिसांनी काल रात्रीच अटक केली. अकुंश रोहिदास चव्हाण व अमोल नागेश काकडे (रा. पापळवस्ती बिबवेवाडी) हे दोघे फरारी होते. मात्र, भोर पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन त्यांना रात्री अटक करून भोर पोलीस ठाण्यात आणले असल्याचे सांगितले.
सदर मारहाणीत कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष रितेश वैद्य हे गंभीर जखमी झाले असून, खेड-शिवापूर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याबाबतची फिर्याद तेजस प्रदीप कुलकर्णी यांनी दिली आहे. पोलीस निरीक्षक पांडुरंग सुतार पुढील तपास करीत आहेत.

Web Title: four arrested