जुन्नर तालुक्यात साडेचारशे कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:08 IST2021-03-30T04:08:08+5:302021-03-30T04:08:08+5:30
कोरोना प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून जुन्नर तालुक्यात एकूण ७ हजार २०२ रुग्ण बाधित झाले आहेत. त्यामध्ये ६ हजार ४६७ ...

जुन्नर तालुक्यात साडेचारशे कोरोनाबाधित
कोरोना प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून जुन्नर तालुक्यात एकूण ७ हजार २०२ रुग्ण बाधित झाले आहेत. त्यामध्ये ६ हजार ४६७ रुग्ण बरे झालेले आहेत. सध्या ४५० रुग्ण कोरोना बाधित असून ते उपचार घेत आहेत. आजपर्यंत २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू दर ३.६७ टक्के आहे.
तालुक्यात सर्वाधिक कोरोना रुग्णाची संख्या नारायणगाव शहरात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून या नारायणगावात १०११ रुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत , त्यापैकी सध्या या गावात ५० रुग्ण सक्रिय आहेत. एकूण २७ रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. वारूळवाडी शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून ३४८ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यापैकी सध्या या गावात १९ रुग्ण सक्रिय आहेत . या गावात आठ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे अशी माहिती वारूळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी दिली.