नाभिक समाज बांधवांना भरणे प्रतिष्ठानचा हातभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:12 IST2021-06-09T04:12:48+5:302021-06-09T04:12:48+5:30
इंदापूर : तालुक्यातील नाभिक समाज बांधव हे कोरोना महामारीत घरी बसून आहेत. व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम ...

नाभिक समाज बांधवांना भरणे प्रतिष्ठानचा हातभार
इंदापूर : तालुक्यातील नाभिक समाज बांधव हे कोरोना महामारीत घरी बसून आहेत. व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक नेते श्रीराज भरणे यांच्या हस्ते तालुक्यातील इंदापूर शहर, बावडा - लाखेवाडी जिल्हा परिषद गट, तसेच सराफवाडी, निरवांगी, खोरोची, निमगाव केतकी परिसरातील भागात कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूचे किट मोफत वाटप करण्यात आले.
या वेळी माहिती देताना युवक नेते श्रीराज भरणे म्हणाले की, गेली दोन वर्षे इंदापूर तालुक्यातील व परिसरातील जे छोटे व्यावसायिक आपला व्यवसाय चालवून रोजीरोटी भागवतात, यांना कोरोना महामारीमुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. यामध्ये उपेक्षित व गरीब नाभिक समाज बांधवांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या सर्व समाज बांधवांना मदत करण्याचे आवाहन केल्यामुळे, कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या सहकार्यातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप शासकीय नियम पाळून केले जात आहे.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे म्हणाले की, इंदापूर शहर हे महामारीच्या विळख्यातून व दुसऱ्या लाटेतून बाहेर पडत असताना जे गरीब व्यावसायिक आहेत त्यांना नितांत जीवनावश्यक वस्तूची गरज होती.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे पाटील, इंदापूर नगरपरिषदेचे नगरसेवक प्रशांत शिताप, प्रा. अशोक मखरे, नाभिक महामंडळाचे तालुका अध्यक्ष अवधूत पवार, नाभिक महामंडळाचे जिल्हा अध्यक्ष रमेश राऊत, संघटक कालिदास राऊत, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
बावडा येथे कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूचे मोफत वाटप करताना युवक नेते श्रीराज भरणे व तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे पाटील व मान्यवर.