शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अबब ! उजनीत सापडला एकोणतीस किलोचा 'कटला' मासा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 19:54 IST

इंदापूर तालुक्यातील उजनी जलाशयात मच्छिमारी करणाऱ्या परमेश्वर बनगे यांच्या जाळ्यात कटला मासा सापडला असून त्याचे वजन तब्बल २९ किलो असून, त्याला शनिवारी इंदापूर मासळी बाजारात प्रतिकिलो दोनशे चाळीस रुपये प्रमाणे सात हजार रुपये असा उच्चांकी दर मिळाला असल्याने संपूर्ण तालुक्यात एकच चर्चा रंगली आहे. 

पुणे (इंदापूर) : इंदापूर तालुक्यातील उजनी जलाशयात मच्छिमारी करणाऱ्या परमेश्वर बनगे यांच्या जाळ्यात कटला मासा सापडला असून त्याचे वजन तब्बल २९ किलो असून, त्याला शनिवारी इंदापूर मासळी बाजारात प्रतिकिलो दोनशे चाळीस रुपये प्रमाणे सात हजार रुपये असा उच्चांकी दर मिळाला असल्याने संपूर्ण तालुक्यात एकच चर्चा रंगली आहे. इंदापूर तालुक्यातील कांदलगाव जवळील परमेश्वर बनगे यांनी उजनी जलाशयात मासेमारी साठी जाळे लावल्यानंतर त्यांना शुक्रवारी संध्याकाळी हा कटला मासा जाळ्यात सापडल्यानंतर शनिवारी सकाळी ११ वाजता इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मासळी बाजारात विक्रीसाठी घेवून आले होते. त्यावेळी एवढा मोठा मासा पाहण्यासाठी व्यापाऱ्यांनी एकच गर्दी केली होती.मासळी बाजारात दत्तात्रय व्यवहारे यांच्या तेजस फिश मार्केटच्या आडतीवर त्या माशाचा लिलाव करण्यात आला, हा मासा विकत घेण्यासाठी अनेक मासे व्यापाऱ्यांनी चढा ओढीने बोली लावल्याने लिलावामध्ये २४० रुपये प्रतिकिलो प्रमाणे २९ किलोच्या माशाला एकूण सात हजार रुपयांचा शनिवारचा सर्वात उच्चांकी दर मिळाला. हा मासा डिकसळचे मासे व्यापारी लक्ष्मण शिर्के यांनी विकत घेतला असून, तो मासा कलकत्त्याला निर्यात केला आहे. उजनी जलाशयात वेगवेगळ्या जातींचे ३० प्रकारचे मासे आढळतात, मात्र जलाशयात महाराष्ट्र राज्य मत्स्य विकास विभागाकडून मत्स्यबीज सोडण्यात हेळसांड झाल्याने व चिलापी माशाच्या आक्रमणामूळे पूर्वी जे कटला, मरळ, रहू, शिंगाडा, चांभारी, वांब हे मुबलक प्रमाणात मिळणारे मासे सध्या कमी प्रमाणात मिळत आहेत. सध्या उजनीतील पाणी कमी झाल्यामुळे नदीपत्रात तळाला असणारे मोठे मासे अगदी सहजपणे सापडत असल्याने अशा मोठ्या वजनाच्या माशांची आवक मासळी बाजारात वाढली आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा मासेमारीचा व्यवसाय उजनी धरणावर चालतो. या धरणात २० ते ३० प्रकारच्या जातीचे मासे सापडतात. या धरणातील मासे परदेशातही पाठविले जातात. या धरणात चिलापी व चांभारी जातीचे मासे मुबलक प्रमाणात मिळतात. इंदापूर मासळी बाजारात चिलापी जातीच्या माशाला मोठी मागणी आहे. असे मासे विक्रेत्यांनी सांगितले. 

टॅग्स :fishermanमच्छीमारUjine Damउजनी धरण