शहरं
Join us  
Trending Stories
1
"थोडं थांबा, मोदींच्या शपथविधीनंतर ..."; राजीनाम्याच्या तयारीतील फडणवीसांना अमित शाह यांनी काय सांगितलं?
2
"महाराष्ट्र काँग्रेस विचाराचं राज्य; लोकसभेची लढाई जिंकली आता लक्ष्य विधानसभा"
3
विधानसभा मनसे स्वबळावर लढणार?; राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर नेते म्हणाले...
4
मोठी बातमी: महाराष्ट्रात हादरा, दिल्लीत बैठक; शिंदे-फडणवीस-अजितदादांमध्ये खलबतं सुरू
5
शरद पवारांच्या पक्षातील ३ आमदार आमच्यासोबत येणार; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा
6
शेअर बाजार घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी 'त्या' दिवशी बक्कळ कमाई केली; पाहा...
7
मोदींसोबत वाजपेयींसारखा गेम करू शकतात चंद्राबाबू नायडू?; भाजपा उचलतंय सावध पाऊल
8
ईव्हीएम जिवंत आहे का? म्हणणाऱ्या मोदींना काँग्रेसचे प्रत्युत्तर; म्हणाले, "पुरावे घेऊन तुमच्याकडे..."
9
अजित पवारांनंतर प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा; ईडीने परत केली १८० कोटींची संपत्ती
10
शेअर मार्केटने मोडला 3 जूनचा रेकॉर्ड; सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाढ, Sensex 76000 पार...
11
जितते कम है, हारते जादा...! पाकिस्तानच्या पराभवानंतर बिचाऱ्या या तरुणीची व्यथा ऐका, Video 
12
लोकसभेतल्या विजयानंतर शिंदेंच्या मतदारसंघावर राणेंचा दावा; उदय सामंत म्हणाले, "फडणवीसांकडे..."
13
याला म्हणतात 'खटा-खट खटा-खट रिटर्न'! 4 वर्षांत ₹1 लाखाचे झाले ₹47 लाख; दिला 4500% चा बंपर परतावा
14
NDA च्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी घेतले लालकृष्ण अडवाणींचे आशीर्वाद
15
NDA नं राष्ट्रपतींकडे केला सरकार बनवण्यासाठी दावा; तिसऱ्यांदा PM बनणार नरेंद्र मोदी
16
नरेंद्र मोदींचा शपथविधी ९ जूनलाच का?; माजी पंतप्रधानांसोबत आहे कनेक्शन
17
...आणि तू विराट कोहलीशी स्पर्धा करतोस! IShowSpeed ने पाकिस्तानी संघाची पार लाज काढली
18
NDAच्या सभेत स्टेजवर मानाचं स्थान मिळालेली 'ती' एकमेव महिला कोण? जाणून घ्या...
19
“NDAचे सरकार पुढील १० वर्षे असणार, काँग्रेस १००चा आकडाही गाठू शकणार नाही”: नरेंद्र मोदी
20
Railway PSU ला Tata Group कडून मिळाली मोठी ऑर्डर, शेअर्स वधारले; १ वर्षात ७०% रिटर्न

गुरगुरणे ऐकले आणि सापडले बिबट्याचे चार बछडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 8:56 PM

गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचे दर्शन नागरिकांना होत आहे. यामुळे येथील नागरिक बाहेर पडण्यास धजावत नाहीत.आता चार बछडे सापडल्यावर तरी वनविभाग जागा होणार का असा सवाल स्थानिक विचारत आहेत. 

ठळक मुद्देशिरूर तालुक्यात सापडले बिबट्याचे चार बछडे  नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, पिंजरा बसवण्याची मागणी 

पुणे  : तामखरवाडी (ता. शिरूर) येथे शनिवारी रामदास केरू खोमणे यांच्या शेतात ऊसतोडणी चालू असताना बिबट्याचे चार बछडे ऊसतोडणी कामगारांना आढळले.वनविभागाने हे बछडे एका कॅरटमध्ये ठेवले. रात्री ७.३० च्या सुमारास बछड्यांची आई कॅरटमधील सर्व बछड्यांना घेऊन गेली. हा सर्व प्रकार वनविभागाच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

   शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी परिसरात बिबट्याचे वास्तव्य आहे. यामुळे येथील नागरिक कायम दहशतीखाली असतात. शनिवारी रामदास केरू खोमणे यांच्या शेतात ऊसतोडणी सुरू होती. या वेळी कामगारांना गुरगुरण्याचा आवाज आला. त्यांनी आवाजाच्या दिशेने पाहिले असता बिबट्याचे चार बछडे त्यांना दिसले. त्यांनी या घटनेची माहिती तातडीने मालकाला दिली. खोमणे यांनी ही माहिती वनविभागाला दिली. जुन्नर येथील वनविभागाचे अधिकारी, तसेच बिबट्या निवारा केंद्राचे अजय देशमुख घटनास्थळी आले. त्यांनी सर्व बछड्यांना एका कॅरटमध्ये ठेवत शेतात सोडून दिले. जवळपास  ८ च्या सुमारास बिबट्याची मादी शेतात आली. तिने एक-एक करून सर्व बछड्यांना सुरक्षित ठिकाणी हलविले. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचे दर्शन नागरिकांना होत आहे. यामुळे येथील नागरिक बाहेर पडण्यास धजावत नाहीत. यामुळे या ठिकाणी पिंजरा बसवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

 

 

 

टॅग्स :PuneपुणेShirurशिरुरleopardबिबट्याforest departmentवनविभाग