शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे | वेगरेचे माजी सरपंच भाऊ मरगळे यांच्यावर विद्यमान सरपंचांकडून खूनी हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 13:16 IST

पौड : मौजे वेगरे येथील जि. प.शाळेत ग्रामसभा सुरू असताना मागील ग्रामसभेचे वृत्त ,प्रोसिडींग व घरकुल यादी बाबत विचारणा केली ...

पौड : मौजे वेगरे येथील जि. प.शाळेत ग्रामसभा सुरू असताना मागील ग्रामसभेचे वृत्त ,प्रोसिडींग व घरकुल यादी बाबत विचारणा केली असल्याच्या कारणावरून विद्यमान सरपंच मीनाथ कानगुडे व त्याचे तीन-चार साथीदार यांनी माजी सरपंच भाऊ पांडुरंग मरगळे यांच्यावर खुनी हल्ला केला. सदर घटना शुक्रवारी (ता. २९) रोजी वेगरे येथे ग्रामसभेदरम्यान दररम्यान घडली असल्याची माहिती पौड पोलिसांनी दिली.

याबाबत फिर्यादी भाऊ मरगळे याने पौड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर यातील मुख्य आरोपी मिनाथ मारूती कानगुडे (वय 37 वर्ष) व अभिषेक दत्तात्रय कानगुडे (वय 21 वर्ष) दोन्ही रा. वेगरे तालुका मुळशी जिल्हा पुणे यांना पौड पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य साथीदार फरारी आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ग्रामसभेदरम्यान  सरपंचांना प्रोसेडिंग बुक व घरकुल यादी बाबत विचारणा केल्याचा राग मनात धरून आरोपींनी पूर्व नियोजनातून फिर्यादीवर काठ्या व शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. यात भाऊ मरगळे गंभीर जखमी झाले. जखमीवर पिरंगुट येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भाऊ मरगळे यांच्या चारचाकी गाडीचीही नासधूस आरोपींनी केली आहे.

आरोपी  मिनाथ मारूती कानगुडे, अभिषेक दत्तात्रय कानगुडे  यांना अटक करण्यात आली असून अन्य दोन आरोपी मुन्ना पोळेकर  रा.वेगरे ता मुळशी जि पुणे व  मिनाथ कानगुडे यांचा साथीदार नाव पत्ता नाहीत नाही  हे फरारी आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव हे करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPaudपौड