शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सॅल्यूट! माजी सरपंच व सहकाऱ्यांनी घडविले 'माणुसकी'चं दर्शन; १०९ कोरोनाबाधित मृतदेहांचे अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 14:48 IST

एखादा कोरोना संशयित असला तर त्याच्यापासून चार हात दूर राहणेच बरे, अशीच आजकाल सगळ्यांची मानसिकता आहे.आपल्याच नातेवाईकांच्या मृतदेहांवर अंत्यविधी ...

एखादा कोरोना संशयित असला तर त्याच्यापासून चार हात दूर राहणेच बरे, अशीच आजकाल सगळ्यांची मानसिकता आहे.आपल्याच नातेवाईकांच्या मृतदेहांवर अंत्यविधी करण्यासाठी लोक धजावत नाहीत. तर बेवारस दूरच... पण समाजात आज अशीही काही माणसे आहेत, ज्यांच्यात माणुसकी सापडते. याचे उदाहरण म्हणजे मंचर येथील शिवसेनेचे माजी सरपंच दत्ता गांजाळे आणि त्यांचे युवा सहकारी कल्पेश (आप्पा) बाणखेले, महेश घोडके,आकाश मोरडे,अक्षय चिखले, सुरज धरम ,शुभम गवळी,जयेश भालेराव,स्वप्निल लोखंडे,राहुल थोरात,सचिन मोरडे,गोटू शेटे, रुपेश(बंटी) मोरडे,सागर रेणुकादास,खुशाल गाडे व यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे रुग्णवाहिका चालक गौरव बारणे,गणेश शिंदे हे होय.

गेल्या वर्षभरात या सर्वांनी मृतदेहाची कुठली हेळसांड न करता सर्वांचे धार्मिक विधी पूर्ण करून आजअखेर १०९ रुग्णांचे अंत्यविधी केले आहेत. या सर्वांना अंत्यविधीसाठी मास्क आणि सॅनिटायझरचे साहित्य मंचर येथील प्रसन्न भागवत,अमोल पारेख,संजय गांधी (आळेफाटा) हे मेडिकल व्यावसायिक पुरवितात. दत्ता गांजाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कृतीतून आजही समाजात माणुसकी जिवंत असल्याचा विश्वास वाढतो. त्यांच्या संवेदनशीलतेला समाजाने सलाम केलाय! या वर्षभराच्या काळात या तरुणांनी अनेक वेळा जीव धोक्यात घातला, पण यातील फक्त एकालाच कोरोना झाला. त्यालाही फार काही त्रास झाला नाही. हे फक्तं आणि फक्तं त्या कुटुंबियांचे आशीर्वाद व आपले सर्वांचे प्रेम यामुळे असे सांगून दत्ता गांजाळे म्हणाले, आम्ही मयत कोरोना रुग्णांचे अंत्यविधी करतोय. तुम्ही कमीत कमी रुग्णांना मदतीचा आणि आत्मविश्वासाचा हात द्या.

कोरोना आज आहे, उद्या जाईल, पण माणुसकी कायम राहील. आम्ही आमचे काम करतोय. तुम्ही कमीत कमी रुग्णांना मदतीचा हात आणि आत्मविश्वासाचा शब्द द्या, तोदेखील आज ऑक्सिजनएवढाच मोलाचा ठरेल.

कोरोनाची पहिली लाट आली. त्या वेळी गांजाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अंत्यविधी केले होते. आता दुसऱ्या लाटेतही मयत कोरोनाबाधित रुग्णांचे अंत्यविधी दिवसा अथवा रात्री कधीही ही टीम करत असते. केवळ मंचर शहरच नाही तर बाहेरगावी जाऊनसुद्धा अंत्यविधी करावे लागतात. दोन दिवसापूर्वी भर पावसात जाऊन गांजाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी एका गावात रात्री कोरोनाबाधित व्यक्तीचा अंत्यविधी केला. विशेष म्हणजे नातेवाईक हजर नसले तरीसुद्धा आपल्या घरातील व्यक्ती समजून विधिवत अंत्यसंस्कार केले जातात.

टॅग्स :Mancharमंचरcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूPuneपुणे