शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
2
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
3
“पंतप्रधान प्रचंड घाबरले, म्हणून मला भटकती आत्मा, राहुल गांधींना शहजादा म्हणाले”: शरद पवार
4
सोनं पुन्हा महागणार, ७५,००० रुपयांच्या पुढे जाणार; इराणमधून आली मोठी बातमी
5
अपघात की हत्या? राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमागे इस्रायलचे षड्यंत्र? चर्चांना उधाण...
6
IPL 2024: RCB कडून खेळण्यापेक्षा त्यांचा सामना पाहणं खूप कठीण; असं का म्हणाली स्मृती?
7
एका कोंबड्यानं घेतला तिघांचा जीव; दोन भावांसह एका युवकाचा मृतदेह विहिरीत सापडला
8
बेडरुममध्ये नोटांचा ढीग, 50 कोटींची रोकड जप्त; IT च्या छापेमारीत सापडलं कोट्यवधींचं घबाड
9
पैसे घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाही; मतदानानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
10
Lok Sabha Elections: "समस्या केवळ दोन कारणांमुळे उद्भवतात...", सचिनने सांगितले मतदानाचे महत्त्व
11
Multibagger Share : ₹१६५० पार जाणार 'हा' शेअर, लिस्टिंगनंतर सातत्यानं देतोय नफा; १३०० टक्क्यांची वाढ
12
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
13
पवईमध्ये मतदार भडकले, EVM मशीन बंद; आदेश बांदेकरांनी शेअर केला Video
14
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
15
गरोदर दीपिकाला मतदान केंद्राबाहेर सांभाळताना दिसला रणवीर सिंह, बेबीबंप पाहून चाहते म्हणाले...
16
Fact Check: राहुल गांधींच्या हातातील 'ते' लाल रंगाचं संविधान चीनचं नाही; व्हायरल दावा चुकीचा
17
Multibagger Stock: शेअर असावा तर असा! २ वर्षांत ५००% पेक्षा अधिक रिटर्न, तुमच्याकडे आहे का?
18
World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण
19
Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य
20
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद देवदर्शनासाठी पुण्यात; दगडूशेठ, दत्तमहाराज, श्री महालक्ष्मीचे घेतले दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 4:14 PM

रामनाथ कोविंद यांच्यासमवेत पत्नी सविता कोविंद व कुटुंबिय उपस्थित होते

पुणे : भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी सकाळी श्रीमंत दगडूशेठ गणपती, लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात दत्तमहाराज आणि सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी सविता कोविंद व कुटुंबिय उपस्थित होते. तिन्ही मंदिरांमध्ये त्यांनी दर्शन घेण्यासोबत आरती केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे कोविंद यांचे सकाळी १०.३० वाजता मंदिरात स्वागत व सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी गणरायाला सपत्नीक अभिषेक देखील केला. तसेच सुख-समृद्ध व आरोग्यसंपन्न्नेकरीता श्रींकडे प्रार्थना केली. यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

 सकाळी १०.५० वाजता बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी दत्तमहाराजांची आरती केली. ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त युवराज गाडवे, खजिनदार महेंद्र पिसाळ, उत्सवप्रमुख अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सव उपप्रमुख युवराज गाडवे, विश्वस्त सुनिल रुकारी, डॉ.पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई आदी उपस्थित होते. महावस्त्र, पुष्पगुच्छ व मिठाई देऊन कोविंद यांचा सन्मान करण्यात आला.

 सकाळी ११.१५ वाजता श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने रामनाथ कोविंद व सविता कोविंद यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. नवरात्रीनिमित्त मंदिरात सुरु असलेल्या तयारीची कोविंद यांनी पाहणी करण्यासोबतच नवरात्रीनिमित्त शुभेच्छा देखील दिल्या. यावेळी श्री महालक्ष्मी देवीची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ट्रस्टच्या अध्यक्षा अमिता अग्रवाल, राजकुमार अग्रवाल, भरत अग्रवाल, अ‍ॅड.प्रताप परदेशी, प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदDagdusheth Templeदगडूशेठ मंदिरTempleमंदिरNavratriनवरात्री