पुणे : भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी सकाळी श्रीमंत दगडूशेठ गणपती, लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात दत्तमहाराज आणि सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी सविता कोविंद व कुटुंबिय उपस्थित होते. तिन्ही मंदिरांमध्ये त्यांनी दर्शन घेण्यासोबत आरती केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे कोविंद यांचे सकाळी १०.३० वाजता मंदिरात स्वागत व सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी गणरायाला सपत्नीक अभिषेक देखील केला. तसेच सुख-समृद्ध व आरोग्यसंपन्न्नेकरीता श्रींकडे प्रार्थना केली. यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद देवदर्शनासाठी पुण्यात; दगडूशेठ, दत्तमहाराज, श्री महालक्ष्मीचे घेतले दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2022 16:15 IST