शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पानसरे खून प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 16:40 IST

जमिनीच्या वादातून मेहबूबभाई पानसरे यांचा निर्घृण खून करण्यात आला होता

जेजुरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक मेहबूबभाई पानसरे यांच्या खुनातील मुख्य आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून इतर दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी दिली शुक्रवारी दि. ७ जुलै रोजी जमिनीच्या वादातून जेजुरीचे माजी नगरसेवक मेहबूबभाई पानसरे यांचा नाझरे जलशयानाजीकच्या वादग्रस्त जमिनीत कुऱ्हाड, कोयता आणि पहारीने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. जेजुरी पोलिसांनी यातील आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करून यातील दोन आरोपीना अटक केली होती. 

गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध करण्यासाठी जेजुरी पोलिसांकडून आरोपींची माहिती पुणे शहर व पुणे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना दिली होती.  त्यानुसार या गुन्ह्याची गंभीरता आणि संवेदनशीलता ओळखून पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदीप कर्णिक यांनी  सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबतच्या सूचना पुणे शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांना सूचना दिल्या होत्या. काल दि. ८ जुलै रोजी जेजुरीतील गुन्ह्याचे दोन आरोपी डेक्कन परिसरात असल्याची गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर,पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव,  पोलीस कर्मचारी सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, प्रदीप गाडे, चेतन अपाटे, सैदोबा भोजराज, पवन भोसले आदींची दोन वेगवेगळी पथके तयार करून आरोपींचा शोध घेऊन मुख्य आरोपी वनिस प्रल्हाद परदेशी, रा. ४०४ गुरुवार पेठ, पुणे, मूळ रा.  बेंद वस्ती, धालेवाडी जेजुरी आणि काका परदेशी उर्फ महादेव विठ्ठल गुरव ( वय ६५ ,वर्षे )  रा.  बेंद वस्ती, धालेवाडी जेजुरी मूळ रा. वाजेगाव ता. फलटण जि सातारा या दोघांना अटक केली. तपासात दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना जेजुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

दोन्ही आरोपीना सासवड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दि.१२ जुलै पर्यंत चार  दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून अजून ही दोघांचा शोध वेगवेगळ्या पथकाकडून घेतला जात असल्याची माहिती जेजुरीचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी दिली. 

टॅग्स :PuneपुणेJejuriजेजुरीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक