शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
4
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
5
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
6
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
7
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
8
पाशांकुश एकादशीला 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; काय घ्यावी काळजी? वाचा!
9
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
10
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
11
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!
12
सकाळी रुग्णालयात... संध्याकाळी जिंकलं गोल्ड मेडल; रोझा कोझाकोव्स्काच्या जिद्दीला सॅल्यूट!
13
"मला त्याची गरज आहे...", घटस्फोटानंतर एकटीच करतेय मुलाचा सांभाळ; अभिनेत्री म्हणाली...
14
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
15
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
16
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
17
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
18
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
19
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
20
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना एक दिवसाची न्यायालयीन कोठडी; येरवडा तुरुंगात रवानगी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 20:37 IST

ज्येष्ठ दाम्पत्याला शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी हर्षवर्धन जाधव यांना झाली आहे अटक..

पुणे : ज्येष्ठ दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (वय ४३) यांना शुक्रवारी ( दि. १८) त्यांची पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने जाधव यांना एक दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांची आता रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

याप्रकरणी अमन चड्डा (वय २८, रा. बोपोडी) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास औंध येथील संधवीनगर येथे घडली होती. यात अजय चरणजितलाल चड्डा (वय ५५) आणि ममता अजय चड्डा (वय ४८) हे जखमी झाले आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण...  अजय चड्डा व ममता चड्डा हे दुचाकीवरुन जात असताना हर्षवर्धन जाधव यांच्या गाडीचा दरवाजा अचानक उघडल्याने त्यात ममता चड्डा यांच्या पायाला लागले. त्याबाबत त्यांनी जाब विचारला असता जाधव यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्याबरोबरील महिला इषा बालाकांत झा (वय ३७, रा. वाकड) यांनीही शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. चड्डा यांनी आपली ह्दयशस्त्रक्रिया झाली असल्याचे सांगितल्यानंतरही जाधव यांनी मारहाण केली.

त्यानंतर चड्डा यांच्या मुलांनी दोघांना रुग्णालयात नेल्यानंतर त्यांना वाटेत जाधव यांची गाडी जाताना दिसली. ते त्यांच्या मागोमाग गेले. आंबेडकर चौकाच्या अलीकडे जाधव यांच्या गाडीने आणखी एकाला धडक दिल्याने तेथे लोकांनी जाधव यांना मारहाण केली. त्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले व त्यांनी जाधव यांना औंध चौकीत नेले. जाधव यांनी आपल्याला मारहाण झाल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी जाधव यांना औंध रुग्णालयात नेले. तेथून रात्री ते पुन्हा पोलीस ठाण्यात आले. तेव्हा आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे समजल्यावर त्यांनी आपल्याला त्रास होत असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर १५ डिसेंबरला दुपारी ते ससून रुग्णालयातून उपचार घेऊन चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात आले. पोलिसांनी त्यांना अटक केली. अटकेत असताना रात्री ९ वाजता त्यांनी पुन्हा आपल्याला अस्वस्थ वाटत असल्याचे सांगितल्यावर त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले.

राजकीय हेतूने गुन्हा दाखल केल्याचा दावाआपल्याविरुद्ध राजकीय हेतूने गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा दावा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. जाधव यांनी सांगितले की, आपण बावधन येथे दुकानात गेलो असताना माझे आणि सहकारी महिलेचे अपहरण करुन मारहाण करण्यात आली. त्याविरोधात आपण पोलिसांकडे तक्रार द्यायला गेला असताना आपली तक्रार घेण्यात आली नाही. राजकीय हेतूने आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :PuneपुणेHarshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधवraosaheb danveरावसाहेब दानवेArrestअटकPoliceपोलिसCourtन्यायालय