जुन्नरच्या माजी आमदार लतानानी तांबे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:08 IST2021-05-31T04:08:42+5:302021-05-31T04:08:42+5:30
श्रीकृष्ण तांबे यांचे १९७३ मध्ये आकस्मिक निधन झाले होते. त्यानंतर जुन्नर तालुका विधानसभा पोटनिवडणुकीत लतानानी तांबे यांना बिनविरोध निवडून ...

जुन्नरच्या माजी आमदार लतानानी तांबे यांचे निधन
श्रीकृष्ण तांबे यांचे १९७३ मध्ये आकस्मिक निधन झाले होते. त्यानंतर जुन्नर तालुका विधानसभा पोटनिवडणुकीत लतानानी तांबे यांना बिनविरोध निवडून दिले होते. तालुक्यातील पहिल्या महिला आमदार होण्याचा मान मिळाला होता. जिल्हा महिला दक्षता समितीच्या त्या सदस्या अजूनही कार्यरत होत्या.
त्यांच्या मागे ४ मुले, सुना, नातवंडे, पतवंडे असा एकत्र कुटुंब परिवार आहे. ओतूर येथील ग्रामविकास मंडळ, श्रीकपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेचे विद्यमान अध्यक्ष अनिल तांबे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी शशिकांत तांबे, संरक्षण विभागातून सेवानिवृत्त अधिकारी दीपक तांबे, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माध्यमिक शिक्षक किशोर तांबे यांच्या त्या मातोश्री होत.
कपर्दिकेश्वर मंदिराजवळ मांडवी किनारी शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला. यावेळी जुन्नरचे तहसीलदार निवडक अधिकारी पोलीस अधिकारी कोरोनाचा नियम पाळत उपस्थित होते.