शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदरमधील माजी उपसरपंचास मारहाण; डॉक्टरसह दोघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2023 16:17 IST

माजी उपसरपंचास मारहाण व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी जेजुरी पोलिसांत अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यासह मारहाणीचा गुन्हा दाखल

नीरा : नीरा (ता.पुरंदर) येथील माजी उपसरपंचास मारहाण व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी जेजुरी पोलिसांत अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीरेचे माजी उपसरपंच कुमार (बाळू) मोरे यांनी या बाबतची फिर्याद दिली आहे. तर मारहाणीत ते जखमी झाले असून त्यांच्या पायाला मार लागला आहे. 

 माजी उपसरपंच कुमार मोरे यांनी जेजुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार मोरे यांनी जनरल स्टोअरचे दुकान चालवण्यासाठी शकुंतला जगताप यांच्याकडून वार्ड नंबर २ मधील सिटी सर्वे नंबर ४३२ व ४३३ मध्ये एक गुंठे जागा भाड्याने घेतली होती. या ठिकाणी त्यांनी दुकानासाठी १० x १० ची टपरी टाकली होती. मात्र ही टपरी नितीन कांतीलाल बोरा यांच्या दुकानाच्या पुढील बाजूचे असल्याने त्यांच्यामध्ये वाद झाला. गुरवार दि. ९ मार्च २०२३ रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास मोरे हे त्यांचे दुकान उघडण्यासाठी गेले असता नितीन कांतीलाल बोरा यांनी मोरे यांना जातीवाचक शिवीगाळ केली. त्याचबरोबर हातात गज घेऊन मोरे यांना मारहाण केली. त्याचवेळी बोरा यांचा भाऊ डॉ. दिलीप बोरा हा देखील हातात काठी घेऊन आला. त्याने सुद्धा मोरे यांना जातीवाचक शिवीगाळ केली आणि त्यांच्या अंगावर धावून गेला. यानंतर मीना दिलीप बोरा यादेखील तेथे आल्या. त्यांनी मोरे यांना जातीवाचक शिवीगाळ केली. अशा प्रकारची फिर्याद मोरे यांनी जेजुरी पोलिसात दिली आहे. याबाबतचा तपास जेजुरी पोलीस करत आहेत.  

टॅग्स :PuneपुणेPurandarपुरंदरPoliceपोलिसsarpanchसरपंचdoctorडॉक्टर