स्मारकाच्या रूपाने बाणखेले यांचे कार्य जनतेसमोर

By Admin | Updated: May 10, 2017 03:49 IST2017-05-10T03:49:33+5:302017-05-10T03:49:33+5:30

‘लोकनेते माजी खासदार स्वर्गीय किसनराव बाणखेले यांचे कार्य त्यांच्या स्मारकाच्या रूपाने जनतेसमोर राहील. जिल्ह्यातील

In the form of a monument, Bankhale's work is in front of the public | स्मारकाच्या रूपाने बाणखेले यांचे कार्य जनतेसमोर

स्मारकाच्या रूपाने बाणखेले यांचे कार्य जनतेसमोर

लोकमत न्यूज नेटवर्क
मंचर : ‘लोकनेते माजी खासदार स्वर्गीय किसनराव बाणखेले यांचे कार्य त्यांच्या स्मारकाच्या रूपाने जनतेसमोर राहील. जिल्ह्यातील उत्कृष्ट स्मारक मंचर येथे तयार केले जाईल,’ असे प्रतिपादन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.
माजी खासदार किसनराव बाणखेले यांचे मंचर येथील स्मारकाचे काम प्रगतिपथावर आहे. या कामाची पाहणी खासदार आढळराव पाटील यांनी केली. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी दत्ता गांजाळे, युवराज बाणखेले, जे. के. थोरात, अश्विनी शेटे, कैलास बाणखेले, अरुण लोंढे, डॉ. मंगेश बाणखेले, लक्ष्मण गांजाळे, कैलास गांजाळे, बाळासाहेब बाणखेले, मीराताई बाणखेले, दत्ता थोरात, वसंतराव बाणखेले, राजेंद्र थोरात, प्रवीण मोरडे, सुनील बाणखेले, शिवाजी राजगुरू, सुरेश भोर, अरुणनाना बाणखेले उपस्थित होते. खासदार आढळराव पाटील यांनी स्मारकाच्या कामाची पाहणी केली. किसनराव बाणखेले यांचा
ब्रॉंझचा पुतळा शिल्पकार बंडेश गांजाळे व त्यांची कन्या सुप्रिया शिंदे यांनी तयार केला आहे. त्यांनी याबाबत खासदार आढळराव पाटील यांना माहिती दिली.

Web Title: In the form of a monument, Bankhale's work is in front of the public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.