शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

माफ करा अन् पुढे जा; माहीने उलगडले तणावमुक्त जीवनाचे रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 19:23 IST

धोनी आता चेन्नई संघाकडून एक खेळाडू म्हणून कदाचित अखेरच्या आयपीएल सत्रात खेळण्यासाठी तयारी करत आहे

- उमेश जाधवमुंबई : कठीण असले तरीही माफ करा आणि पुढे जा, असे सांगत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने तणावमुक्त जीवनाचे रहस्य उलगडले. अन्य लोक आपल्याबाबत काय विचार करतात याची काळजी करण्यात आपली रात्रीची झोप वाया घालवत नाही.याबाबत मी निश्चिंत असल्याचेही धोनीने सांगितले. आपल्या शानदार आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत भारताला दोन विश्वचषक जिंकून देणारा ४३ वर्षीय माजी यष्टीरक्षक फलंदाज धोनीला दिग्गज खेळाडूंपैकी मानले जाते. त्याने मैदानावर आपल्या शांत आणि एकाग्र दृष्टीकोणाद्वारे नेतृत्व करणाऱ्यांसाठी उच्च मानक स्थापित केले आहे.धोनी आता चेन्नई संघाकडून एक खेळाडू म्हणून कदाचित अखेरच्या आयपीएल सत्रात खेळण्यासाठी तयारी करत आहे. एका चाहत्याने सल्ला मागितल्यावर त्याने तणावमुक्तीवर वक्तव्य केले.‘धोनी“ ॲप सादर करताना महेंद्रसिंह धोनी म्हणाला की, आयुष्य साधे ठेवण्यावर माझा विश्वास आहे. स्वत:प्रती प्रमाणिक रहावे, लोक तुमच्यासाठी जे करत आहेत त्यासाठी त्यांचे आभार माना. नेहमी हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असा विचार करून अधिकची मागणी करू नका.यावेळी भारताचा यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन हादेखील उपस्थित होता. धोनी म्हणाला की, मला माहिती आहे की ॲप थोडे अधिक असे म्हणते. पण संपूर्ण गोष्ट कृतज्ञता बाळगणे, धन्यवाद म्हणणे, मोठ्यांचा आदर करणे आणि लहानांना प्रेम देणे याबद्दल आहे. चेहऱ्यावर स्मित ठेवा..!धोनी म्हणाला की, कोणतीही परिस्थिती असली तरी चेहऱ्यावर स्मित ठेवा. समस्या आपोआप दूर होईल. असे करणे कठीण असले तरीही तुमच्यात लोकांना माफ करण्याची शक्ती असायला हवी. अनेक लोकांमध्ये ही क्षमाशक्ती नसते.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMS Dhoniमहेंद्रसिंग धोनी