वन विभागाने तयार केली स्वतंत्र रेस्क्यू टीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:10 AM2021-02-07T04:10:19+5:302021-02-07T04:10:19+5:30

पुणे : पुणे शहरात दिवसेंदिवस मानव व वन्यजीव संघर्ष वाढत आहे. त्यामुळे अशा घटनांवर उपाययोजना करण्यासाठी वन विभागाने ...

The Forest Department formed an independent rescue team | वन विभागाने तयार केली स्वतंत्र रेस्क्यू टीम

वन विभागाने तयार केली स्वतंत्र रेस्क्यू टीम

Next

पुणे : पुणे शहरात दिवसेंदिवस मानव व वन्यजीव संघर्ष वाढत आहे. त्यामुळे अशा घटनांवर उपाययोजना करण्यासाठी वन विभागाने स्वत:ची एक रेस्क्यू टीम तयार केली आहे. त्यात वनविभागातील वनअधिकारी व वनकर्मचारी सर्व यंत्रसामग्रीसह नवीन तंत्रज्ञानाने सज्ज असणार आहेत. या टीमला आरआरटी (Rapid Response Team) नाव असून, त्यांचे आज वनभवन येथे प्रात्याक्षिक झाले.

रेस्क्यू टीममध्ये वनविभागातील वनपरिक्षेत्रनिहाय असे एकूण १९ कर्मचारी आहेत. अधिकारी व कर्मचारी यांना वनविभागातील वन्यजीव तज्ज्ञ व रेस्क्यू संस्था, बावधन यातील तज्ज्ञ यांच्या मदतीने प्रशिक्षण देण्याचे काम आजपासून सुरू झाले. या वेळी मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) सुजय दोडल, उपवनसंरक्षक राहुल पाटील, सहा. वनसंरक्षक आशुतोष शेंडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक पवार, भूगाव स्थित रेस्क्यू टीमच्या नेहा पंचमिया आदी उपस्थित होते. उपस्थित होते.

मानव वन्यप्राणी संघर्षाच्या अनुषंगाने वन्यप्राणी रेस्क्यू करण्याच्या वेळी रेस्क्यू साहित्य, टीमचे सदस्य वेळेत उपलब्ध होतील, याबाबतचे नियोजन करणे, रेस्क्यू टीमने घटनास्थळी तत्काळ पोहोचणे, घटनास्थळी लोकांची गर्दी कमी करणे आदी माहिती प्रशिक्षणात देण्यात आली.

अत्याधुनिक साहित्य अन‌् २४ तास हेल्पलाइन

अत्याधुनिक साधनसामग्रीसहित, जसे की रेस्कु वाहन, सेफ्टी ड्रेसकोड, वॉकीटॉकी व इतर आधुनिक प्रकारची साहित्यसामग्री उपलब्ध केली आहे. या टीमला संपर्क करण्यासाठी 24 तास संपर्क करता येईल, असे हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्यात येणार आहेत. प्रत्येक शनिवारी प्रशिक्षण कार्यक्रम होणार आहे. उत्कृष्ट काम करणाऱ्यांना पदक देऊन गौरव करण्यात येणार आहे अशी माहिती राहुल पाटील यांनी दिली.

राज्यात पुण्यातच सर्वप्रथम स्वतंत्र रेस्क्यू टीम

पाषाण परिसरात पहिल्यांदा गवा आला तेव्हा त्याला आपले प्राण गमवावे लागले होते. कारण, कोणत्याच यंत्रणेकडे योग्य नियोजन नव्हते. त्यामुळे त्या घटनेनंतर वन विभागाने स्वतंत्र रेस्क्यू टीम तयार करण्याचे ठरविले होते. त्यानुसार राज्यात सर्वप्रथम पुणे वनविभागामार्फत आरआरटी टीम तयार करण्यात आली आहे.

Web Title: The Forest Department formed an independent rescue team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.