शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात शालेय विद्यार्थ्यांना विषबाधा ; २१ विद्यार्थी रुग्णालयात दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 14:43 IST

शालेय पोषण आहारातील भाताचे सेवन केल्यामुळे पुण्यात २१ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. कात्रज येथील स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. 

पुणे : शालेय पोषण आहारातील भाताचे सेवन केल्यामुळे पुण्यात २१ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. कात्रज येथील स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, कात्रज येथील या शाळेतील इयत्ता ८वी, ९वी आणि १०वी'च्या २१ विद्यार्थ्यांना आणि एका  शिक्षिकेने सकाळी १०च्या सुमारास शालेय पोषण आहारातील खिचडी खाल्ली.  खातानाही त्यांना रॉकेलचा वास येत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्यानंतर तासाभराने त्यांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरु झाला. शाळेने तात्काळ भारती विद्यापीठ रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. ४ दिवसांपूर्वी नव्या बचत गटाला (सेंट्रल किचन) या कामाचा ठेका दिल्याचे समजते. दरम्यान शाळेने या प्रकरणी भारती विद्यापीठाच्या पोलीस निरीक्षकांना पत्र दिले असून त्यात अन्न शिजवणाऱ्या रजनी महिला कार्यकारी या संस्थेवर कारवाईची विनंती केली आहे. 

गेली दोन  दिवसापासून खिचडीभात खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळत होत असल्याच्या तक्रारी होत्या. दोन दिवसांपूर्वी सुद्धा भात खाल्यावर मुलांना त्रास झाला होता. त्याचवेळी शाळेकडून कारवाई झाली असती तर आजचा गंभीर प्रसंग उद्भवला नसता असा आरोप पालक कैलास पाचापूरे यांनी केला आहे.खिचडीभातालादरम्यान या प्रकरणी स्थानिक नगरसेवकांनीही आक्षेप घेत मुलांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शाळेवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सध्या या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करत आहेत.  

टॅग्स :katrajकात्रजSchoolशाळाEducationशिक्षण