अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:07 IST2021-02-05T05:07:11+5:302021-02-05T05:07:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाल्हे : अपघात टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होणे गरजेचे आहे. याची जबाबदारी नागरिकांवर आहे, अशी ...

अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळा
लोकमत न्यूज नेटवर्क
वाल्हे :
अपघात टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होणे गरजेचे आहे. याची जबाबदारी नागरिकांवर आहे, अशी माहिती पोलीस अधिकारी नवनाथ वाघमोडे यांनी दिली.
महामार्ग पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार महामार्ग पोलीस केंद्र बारामती फाटा यांच्या मार्गदर्शना खाली ३२ वे रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहेत. यासाठी 'सडक सुरक्षा जीवन रक्षा, या घोष वाक्यसह चित्ररथ परिसरात फिरवत आहेत. या अंतर्गत वाल्हे येथे कार्यक्रमात वाघमोडे बोलत होते.
या फिरत्या वाहनातून वाहनचालकांच्या जबाबदऱ्या, आपला प्रवास सुखाचा होण्यासाठी घ्यावयाची काळजी याविषयी माहिती, सूचना असलेल्या पत्रकाचे वाटप करण्यात येत आहे. याला वाहनचालकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
फोटो ओळ. रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत चित्ररथ व रहदारी सूचना नियमांचे परिपत्रक देऊन माहिती देताना पोलीस अधिकारी नवनाथ वाघमोडे.