शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

'डिजिटल डिटॉक्स’, 'नो स्क्रीन डे' पाळाच! सोशल मीडियाचे व्यसन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 23:00 IST

मानसोपचारतज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

ठळक मुद्देबिहेवियरल थेरपी, समुपदेशन, औषधोपचार आदी उपायांची गरज ‘फोन किंवा कॉम्प्युटरवर किती वेळ घालवायचा, याचे प्रत्येकाने स्वत:वर निर्बंध घालाकॅफेटेरिया, घरातील भोजनगृह, शयनकक्ष अशा ‘स्क्रीन’ न वापरणे आदी उपायांचा चांगला उपयोग

प्रज्ञा केळकर-सिंग - पुणे : जगभरात दररोज सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या २०१८ पर्यंत ३२६.१ अब्ज इतकी होती. २०२३ पर्यंत हा आकडा ४४८ अब्ज इतका वाढणार असल्याची शक्यता एका खाजगी सर्वेक्षणातून पुढे आली आहे. भारतातील नागरिक वर्षातील ७५ दिवस, तरुणाई दिवसातील ४-७ तास केवळ स्मार्टफोन वापरण्यात घालवतात असाही निष्कर्ष काढण्यात आला आहे. व्यतीत सोशल मीडियाचे व्यसन ही धोक्याची घंटा असून, डिजिटल डिटॉक्सिंग, नो स्क्रीन डे, नो स्क्रीन झोन हे उपाय वेगाने अवलंबण्याची गरज असल्याचे मत जाणकारांनी नोंदवले आहे.सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापुढे सोशल मीडियावर सक्रिय राहणार नसल्याचे व्टिट केले. त्यांच्या या घोषणेनंतर सर्वच माध्यमांमधून चर्चेला उधाण आले. यानिमित्ताने आपण सोशल मीडियाशिवाय जगूच शकत नाही का, हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सोशल मीडियाचा वापर व्यसन बनल्याचा आणि त्यातून मानसिक आजार उदभवत असल्याच्या अनेक घटना दररोज समोर येत आहेत. कुटुंबांमधील विसंवाद, नात्यांमधील दुरावा, नैराश्य, त्यातून होणा-या आत्महत्या अशा अनेक घातक परिणामांच्या काठावर आपण उभे असल्याचा निष्कर्ष पुढे येत आहे.मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हिमानी कुलकर्णी म्हणाल्या, ‘सोशल मीडियाचे व्यसन लागण्याचे प्रमाण प्रत्येक वयोगटामध्ये वेगवेगळे असते. ज्येष्ठ नागरिक सर्वांशी कनेक्ट राहण्यासाठी, एकाकीपणा घालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात फेसबूक आणि व्हॉटसअ‍ॅपचा वापर करतात. मात्र, इंटरनेट वापरण्याचे पूर्णपणे ज्ञान नसल्याने अनेकदा त्यांची फसवणूक होऊ शकते. आभासी जगात एकमेकांशी संवाद साधणे सोपे झाले आहे. त्यामुळे तरुणाई मोठ्या प्रमाणात सोशल मिडियावर अवलंबून राहू लागली आहे. ‘सुडो इमेज’ दाखवण्याची धडपड, आयुष्यातील प्रत्येक घटना जगाशी शेअर करण्याची इच्छा अशी अनेक कारणे त्यामागे आहेत. लहान मुले गेमिंगच्या विश्वात हरवून जातात आणि सोशल मीडियाशी कनेक्ट होतात. या सर्व गदारोळात मानसिक स्वास्थ्यासाठी डिजिटल डिटॉक्स अत्यंत गरजेचे बनले आहे. स्वत:ला वेळीच आवर न घेतल्यास बिहेवियरल थेरपी, समुपदेशन, औषधोपचार आदी उपायांची गरज भासू शकते.’डॉ. सुजाता वाटवे म्हणाल्या, ‘फोन किंवा कॉम्प्युटरवर किती वेळ घालवायचा, याचे प्रत्येकाने स्वत:वर निर्बंध घालून घ्यायला हवेत. घरामध्ये ठरावीक वेळ ठरवून घेऊन त्यावेळी डिजिटल जगापासून दूर राहिले पाहिजे. आभासी जगात जगण्यापेक्षा प्रत्यक्ष समोर असलेल्या आपल्या माणसांशी संवाद साधला पाहिजे.’.............‘डिजिटल डिटॉक्स’च्या माध्यमातून इंटरनेटपासून लांब राहण्याची सवय स्वत:ला लावून घेणे अत्यंत आवश्यक आहे. हा कालावधी हळूहळू वाढवत नेता येतो. आपला संवाद सोशल मिडियावर अवलंबून नाही, हे एकदा समजून घेतले की त्यापासून दूर राहणे फार अवघड नाही. ६ महिन्यांमध्ये ८ दिवस किंवा वर्षभरात १५ दिवस ते एक महिना असे डिजिटल डिटॉक्सचे प्रयोग अनेक जण यशस्वीपणे करत आहेत. नो स्क्रीन डे अर्थात आठवड्यातून एक किंवा दोन दिवस स्क्रीनपासून पूर्णपणे दूर राहणे, ‘नो स्क्रीन झोन’ अर्थात ऑफिसमधील कॅफेटेरिया, घरातील भोजनगृह, शयनकक्ष अशा जागी ‘स्क्रीन’ न वापरणे या उपायांचा चांगला उपयोग होतो. आपण दिवसभरात किती वेळ ‘व्हर्च्युअल’ जगात राहिलो, हे दाखवून देणारी ‘अ‍ॅप्लिकेशन्स’ही वापरता येतात.- मुक्ता चैतन्य, इंटरनेट अभ्यासक

टॅग्स :PuneपुणेSocial Mediaसोशल मीडियाHealthआरोग्य